मळगांव वाचनालयाच्या वतीने वकृत्व स्पर्धेचा निकाल व सत्कार संपन्न
🟥मळगांव वाचनालयाच्या वतीने वकृत्व स्पर्धेचा निकाल व सत्कार संपन्न
🟥स्पर्धेत सहभागी विद्यार्थी-विद्यार्थीनींचे घवघवीत यश
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी :सुखदेव राऊळ
🎴सावंतवाडी,३१: मळगांव वाचनालयाच्या वतीने वकृत्व स्पर्धेचा निकाल तसेच कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर आयोजित डॉ . अरविंदभाई खानोलकर व कुटुंबीय पुरस्कृत स्व. डॉ.सौ.मालती दतात्रय खानोलकर स्मृती जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृहात पार पडली .
या स्पर्धेतील मोठ्या गटात कु. अलिशा अनिल पाटकर, कुडाळ हायस्कूल कुडाळ तर लहान गटात रेश्मा संदेश पालव जि.प.शाळा इन्सुली नं .४ यांनी प्रथम क्रमांक मिळविले.आठवी ते दहावी या मोठ्या गटात कु. पूर्वा रामदास चांदरकर नेमळे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय नेमळे हिने व्दितीय , तर कु. मनस्वी प्रवीण मांजरेकर या आर.पी.डी.हायस्कूल सावंतवाडी हिने तृतीय क्रमांक मिळवला. तर कु. तन्वी प्रवीण लुडबे या लक्ष्मीनारायण विद्यालय बिबवणे, कुडाळ व कु.अस्मिता झिलू शिंदे या न्यू इंग्लिश स्कूल मडूरा यांनी अनुक्रमे उतेजानार्थ क्रमांक मिळविले.
इयत्ता पाचवी ते सातवी गटात यज्ञेश युवराज शिंदे या नेमळे माध्यमिक विद्यालय नेमळे च्या विद्यार्थ्यांने व्दितीय , तर अस्मी प्रवीण मांजरेकर या आर. पी.डी.हायस्कूल सावंतवाडी व संस्कार महेश शिरोडकर या व्ही एन. नाबर मेमोरियल हायस्कूल बांदा व निधी चंद्रकांत राऊळ यि मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव यांनी अनुक्रमे उत्तेजनार्थ क्रमांक मिळविले.
या विद्यार्थ्यांंच्या सत्कार कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. मिलिंद अरविंद खानोलकर यांच्या हस्ते स्व. डॉ. सौ. मालती दत्तात्रय खानोलकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलनाने करण्यात आले.यावेळी परीक्षक भरत स. गावडे , चंद्रकांत अ. सावंत , सौ. सुमेधा सावळ, वाचन मंदिराच्या अध्यक्षा सौ. पद्मा वि. फातपेंकर, व उपाध्यक्ष बाबली नार्वेकर , कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर , संचालक विलास मळगावकर , पृथ्वीराज बांदेकर व रवींद्रनाथ कांबळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, ग्रंथ भेट व प्रमाणपत्र देऊन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुनाथ नार्वेकर ,सूत्रसंचालन पृथ्वीराज बांदेकर यांनी केले. या कार्यक्रमाला शिक्षक, पालक , विद्यार्थी व इतर वाचक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_