कणकवली तालुक्यातील राज्यमार्ग, गावातील जोड रस्त्यांच्या अडचणी संदर्भात पाहणी करा..
▪️शिवसेना नेते संदेश पारकर यांचे तहसीलदार रमेश पवार यांना निवेदन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.२६: तालुक्यातील अंतर्गत राज्यमार्ग, गावामध्ये जाणारे जोड रस्ते आहेत. त्याठिकाणी नागरिकांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, महामार्ग ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घ्या. तसेच, आपण स्वतः कणकवली तालुक्यात ज्या-ज्या ठिकाणी रस्ते आहेत. त्या ठिकाणी नागरिकांना काय अडचण येत आहे, याची पाहणी करावी अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी कणकवली तहसीलदार रमेश पवार यांच्याकडे केली. दरम्यान बोर्डवे येथील ग्रामस्थांनी आपल्या अडचणी तहसीलदारांना समोर मांडल्या. यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले, संदेश पटेल, शिवसेना विभाग प्रमुख रुपेश आमडोस्कर, मोहन येंडे, सखाराम येंडे, अहमद शेख, विवेक एकावडे, सतिश येंडे, नरेश येंडे, महादेव राठवड, शरद साळवी, नागेश चव्हाण, दिवा परब, बाबू राणे, दादा सावंत, नंदादीप तेली, दिलदार शेख आदी बोर्डवे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी तहसीलदार यांनी स्वतः पाहणी करतो, लवकरच बैठक घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करुयात असे सांगितले. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले, त्यामध्ये बोर्डवे मध्ये जाण्यासाठी महामार्गावर याठिकाणी क्रॉस सिग्नल व गतिरोधक करण्यात यावे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या चालू आहे. गाव बोर्डवे, आंब्रड, कळसुली इत्यादीगावांकडे जाण्यासाठी ओसरगाव या ठिकाणी महामार्गावरून फाटा आहे. तरी नवीन महामार्ग चौपदरीकरणामध्ये सदर ठिकाणी जाण्या-येण्यासाठी कोणतीही सोय केलेली नाही. त्यामुळे याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी दोन्ही बाजूनी गतिरोधक व क्रॉस सिग्नल आवश्यक आहे. तसेच कंपनीकडून ओसरगाव तलाव येथे क्रॉस सिग्नल बसणार असे समजते जर ओसरगाव तलावावर क्रॉस सिग्नल बसत असेल तर दोन्ही बाजूनी ओसरगाव -बोर्डवे-आंब्रड-कळसुली व इतर लगतच्या गावांकडे जाण्या-येण्यासाठी दोन्ही बाजूने बायपास रस्त्याची आवश्यकता आहे. तरी आपल्या स्तरावरून विचार विनिमय करून कळसुली फाट्यावर क्रॉस सिग्नल, गतिरोधक किया ओसरगाव तलावावरून बायपास रस्ता मंजूर करून मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

