कोलगांव माजी उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते फ्रान्सीस डिसोझा यांच्या वर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी
*▪️”आमचो सायबा” आमच्यात नाही;अनेकांना अश्रू झाले अनावर*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.२८:-* कोलगांव चे माजी उपसरपंच तसेच सामाजिक कार्यकर्ते कॅथोलीक बँक चे संचालक फ्रान्सीस डिसोझा(वय६२)यांचे काल सकाळी गोवा येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. फ्रान्सीस डिसोझा यांचा कोलगाव सह आजूबाजूच्या गावात सुद्धा त्याचा मोठा जनसंपर्क होता त्यांनी अनेक गोरगरीब लोकांना मदतीचा हात दिला.त्याच्या जाण्याने कोलगाव सह आजूबाजूच्या गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
फ्रान्सीस डिसोझा यांचा स्वभाव एकदम मनमेळवू, शांत, प्रामाणिक होता कोणीही त्याच्याकडे मदतीसाठी गेले तर कधीच ते नकार देत नव्हते, त्याच्याकडे नाही हा शब्द नव्हता..

गावात त्यांना सायबा म्हणून परिचित होते,फ्रान्सीस डिसोझा हे जरी ख्रिश्चन धर्माचे असले तरी त्यांचे हिंदू धार्मियासोबत अगदी जवळचे संबंध होते, ते दर वर्षी गणपती सणाला हिंदू बांधवाकडे जायचे तसेच ईद ला सुद्धा मुस्लिम बांधवाकडे जायचे त्यांना आपल्याकडून जमेल तशी मदत करायचे.
फ्रान्सीस डिसोझा ह्यांनी आपल्या गावाला खरोखरचं विकासात्मक दृष्टीने इतर गावापेक्षा कोलगाव कायम अग्रेसर ठेवला.त्यांचे अंत्य दर्शन घेण्यासाठी आलेल्या लोकांना अश्रू अनावर झाले, “आमचो सायबा”अशी साद देत एकच हंबरडा फोडला.. विविध क्षेत्रात त्यांनी खूप उल्लेखनीय काम केले. बांबू ची शेती, कोलगाव सोसायटी मध्ये, ग्रामपंचायत मध्ये खरच त्यांनी प्रामाणिक काम केले. अनेकांना त्यांनी आपल्या पायावर उभे केले..त्याचा सारखे व्यक्तिमत्व पुन्हा होणे शक्य नाही,त्यांनी आपल्या मुलांना सुद्धा समाज सेवेचे बाळकडू दिले होते. माजी जि. प. सदस्य मायकल डिसोझा यांना सुद्धा मोठा आधार होता, निवडणुकीत असू किंवा कोणत्याही प्रसंगात नेहमीचे ते आपल्या मुलाप्रमाणे प्रत्येकाच्या पाठी उभे राहायचे.आज त्याच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले.ह्यावेळी विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.काल अंत्य दर्शनाला पार्थिव घरी ठेवण्यात आले होते यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार दिपक केसरकर,आमदार वैभव नाईक, संजय पडते, छोटू पारकर, व्हिक्टर डॉन्ट्स, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

