कोकण

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये रंगभरण स्पर्धा उत्साहात

*भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये रंगभरण स्पर्धा उत्साहात*

सावंतवाडी – यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित रंगभरण स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. विविध प्रकारचे रंग व ब्रश घेऊन आलेल्या चिमुकल्यांनी स्पर्धेचे वातावरण अतिशय रंगतदार केले. शाळेच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक व प्राचार्य व्यंकटेश बक्षी यांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.

रंगभरण स्पर्धा दोन गटात घेण्यात आली. यापैकी चार ते पाच या वयोगटातील विजयी स्पर्धक पुढीलप्रमाणे – ऋग्वेद हरीश सावंत प्रथम क्रमांक, विहान विशाल पवार व दूर्वा भागो खरात द्वितीय क्रमांक विभागून, साक्षी नारायण कदम तृतीय क्रमांक. चिन्मय साईप्रसाद नाईक व लोकेश समीर सावंत उत्तेजनार्थ. सहा ते सात वयोगटातील विजयी स्पर्धक पुढीलप्रमाणे – श्रेया संतोष मेस्त्री प्रथम क्रमांक, परिणीती पृथ्वीराज प्रताप द्वितीय क्रमांक, सानवी विरंती फायदे तृतीय क्रमांक, भाग्यश्री रवींद्र म्हादळकर व शुभंकर सलील वंजारी उत्तेजनार्थ. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बांदेकर फाईन आर्ट्स कॉलेजचे प्रा.अक्षय सावंत यांनी काम पाहिले.

यासोबतच पालकांसाठी सॅलड मेकिंग व कोल्ड कुकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी सॅलड मेकिंग प्रकारात रजनी गुडीगर तर कोल्ड कुकिंगमध्ये पूजा नाईक विजयी ठरल्या. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा.नेहल सांडये यांनी काम पाहिले. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. रंगभरण स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना लवकरच बक्षीस वितरण समारंभात गौरविण्यात येईल असे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका देसाई व आभार प्रदर्शन श्वेता खानोलकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!