प्रभावती काॅम्प्युटर एज्युकेशन संस्थेच्या संगणक परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

🛑प्रभावती काॅम्प्युटर एज्युकेशन संस्थेच्या संगणक परीक्षेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

🛑तीन अभ्यासक्रमांसाठी संस्थे मधून परिक्षेत बसलेले ७५ विद्यार्थी-विद्यार्थीनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी :सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी,२६: महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळातर्फे जुलै २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नाॅलाॅजी ,काॅम्प्युटर अकाऊंटीग अँड ऑफिस ऑटोमेशन आणि सर्टिफिकेट कोर्स इन डी.टी.पी या अभ्यासक्रमांमध्ये
सावंतवाडी तालुक्यातील प्रभावती काॅम्प्युटर्सच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. सावंतवाडी तालुक्यातील प्रभावती काॅम्प्युटर एज्युकेशन संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेत ७५ विद्यार्थी-विद्यार्थीनीनी ८० टक्के पेक्षा जास्त गुणांकन मिळवले आहे.
सर्टिफिकेट कोर्स इन काॅम्प्युटर अकाउंटींग अॅन्ड आॅफिस आॅटोमेशन या अभ्यासक्रमात कु. फ्रँकलिन फर्नांडिस हा ८७.०० टक्के गुण मिळवून जिल्हयात पहिला आला. कु.दत्तप्रसाद सावंत हा ८१.५० टक्के गुण मिळवून जिल्ह्यात दुसरा आला. तर कु. योगिनी तळवणेकर ही ८१.२५ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात तिसरी आली.
सर्टिफिकेट कोर्स इन इन्फाॅर्मेशन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमात कु. अपर्णा नाईक व कु. गायत्री साबळे या दोघीही ८७.२५ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात पहिल्या आल्या. कु. रुपाली लेडीज ही ८६.२५ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात दुसरी आली. तर कु. लाजरी हरमलकर ही ८५.५० टक्के गुण मिळवून जिल्ह्यात तिसरी आली.
सर्टिफिकेट कोर्स इन डेस्कटॉप पब्लिशिंग या अभ्यासक्रमात कु. सारिका पालव ही ८६.७५ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात पहिली आली. कु. तेजस्वी गावडे ही ८२.५० टक्के गुण मिळवून जिल्ह्यात दुसरी व कु. तृप्ती श्रुगांरे ही ८१.५९ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात तिसरी आली.
या तीन अभ्यासक्रमासाठी संस्थे मधून ७५ विद्यार्थी-विद्यार्थीनी परिक्षेला बसले होते. या मधील सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
कु. फ्रँकलिन गोम्स, कु. ममता जाधव, कु. कांचन करंगफुटकर, कु. शांताराम खडपकर, कु.यश माधव, कु. नंदकिशोर मेस्त्री, कु. रश्मी नाईक, कु. अस्मिता पेडणेकर, कु. तनया राऊळ, कु. कोमल सावंत, कु. तृप्ती श्रुगांरे, कु.संजना उमाळकर, कु, जीवन बंड, कु. गौरी बांदेकर, कु. नयना बरागडे, कु. यशश्री गावडे, प्राजक्ता गुरव, कु. श्वेता जाधव, कु. विठ्ठल जंगले, सानिका कांबळे, कु. सखाराम खडपकर,कु.स्नेहल कुडाळकर,कु.पल्लवी मडवळ,कु.वेदीका नाईक, कु. दिनार पिंगुळकर,कु.प्रजत सावंत, कु. आरती शेडगे, कु.स्नेहल शिवलकर, कु. योगिनी तळवलकर, कु. लक्ष्मी बनसोड, कु. गुरुदत्त भाग्यश्री माळकर,कु.अपर्णा नाईक, कु. साधना नाईक, कु. सुशांत राऊळ, कु. त्रिवेणी राऊळ, कु. क्षितिज सरदेसाई, कु. प्रतिक्षा सावंत, कु. साक्षी सावंत, कु. गौरी शिंदे हे विद्यार्थी-विद्यार्थीनी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत,
या सर्व यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थीनींचे संस्था प्राचार्य संदीप देवळी यांनी अभिनंदन केले आहे. या सर्व विद्यार्थी-विद्यार्थीना सरीता गवंडे यांनी मार्गदर्शन केले होते. आयटी, डीटीपी, वेबपेज डिझायनिंग, एमएससीआयटी व टॅली या अभ्यासक्रमासाठी नवीन बॅचेस साठी प्रवेश सुरू आहेत. संस्थेच्या वसंत प्लाझा, गांधी चौक, दुसरा माळा, सावंतवाडी येथे मुली व मुलांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

________________________
*_🕴️पाहिजेत… पाहिजेत…पाहिजेत…🕴️_*

*नोकरीची सुवर्णसंधी..😍 सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी😍*

_*🍽️हॉटेल डार्क फॉरेस्ट, आंबोली येथे विविध विभागातील जागा भरणे आहे🏨*_

*▪️रिसेप्शनिस्ट(२ जागा )*
महिला किंवा पुरुष चालेल.पगार १२०००/-( पगार सह जेवण राहण्याची सोय)

*▪️रिझरव्हेशन(१ जागा )*
पगार-१४०००/-(राहण्याची जेवणाची सोय)

*▪️एक्सिकटीव्ह हाऊस कीपर(१ जागा )* पगार-१५०००/-

*▪️रूम बॉय(४ जागा )*
(पगार १००००/-सह जेवण राहण्याची सोय)
*▪️कॅप्टन(१जागा )*
पगार १३०००/- (जेवणाची राहण्याची सोय)
*_संपर्क:-_* *हॉटेल डार्क फॉरेस्ट, आंबोली*
9423251804

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!