डेगवे गावचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न
*🛑डेगवे गावचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी: संजय भाईप*
*🎴बांदा :२३ मार्च*
कोकणातील प्रत्येक गावा- गावातील शिमगोत्सवाची परंपरा वेग- वेगळीअसते,सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावात आंबेखणवाडी,फणसवाडी,जांभळवाडी, मोयझरवाडी, बाजारवाडी,व श्रीराम मंदिर,श्री स्थापेश्वर मंदिर व श्री माऊली मंदिर अशा ठिक-ठिकाणी सार्वजनिक होळी पौर्णिमे दिवशी घालतात.माऊली पंचायतन देवतेकडे सर्वात मोठी म्हणजे ४० -४५ फुट होळी घालतात.त्यानंतर ब्राह्मणांच्या मंत्र घोषात विधिवत पुजा केली जाते.नंतर होळीला प्रत्येक घरातून नारळ अर्पण करतात.व गावच्या व कुंटूबाच्या हितासाठी गाव गाराणे घालतात.
दुसऱ्या दिवशी रात्री वाडी निहाय प्रत्येक घरी देवाचे निशाण घेऊन “नौबत”केली जाते.ती झाल्यावर रात्री वाडीनिहाय “रोबांट” घालत ग्रामदेवता श्री माऊलीच्या होळीकडे सर्वजण एकत्र जमतात.तेथे गावहिताचे गाराणे करून सर्व निशाण घेऊन स्थापेश्वराच्या मंदिराच्या होळीकडे वाजत गाजत जातात.तेथे गावहिताचे गाराणे घालतात.
होळीच्या ५व्या दिवशी सर्व निशाण माऊली मंदिर होळीच्या ठिकाणी एकत्र जमा होतात.त्या सर्व निशाणाची विधिवत पुजा केल्यानंतर वाडीनिहाय निशाण प्रत्येक घरी “तळी”साठी जातात.प्रत्येक घरी त्याचे आदराने स्वागत केले जाते.नंतर सर्व निशाण जांभळवाडी येथे “मांडावर” एकत्र येतात.संध्याकाळी ४वाजता “रोबांट” सुरु होते.धुलीवंदनाच्या दिवशी विविध रंगाच्या रंगानी न्हाऊन निघालेल्या लहानमुलां पासून ते आजच्या तरुण.मंडळी व ज्येष्ठापर्यत सारेजण देहभान विसरून नाचायला लागतात.हे पहायला महिला,मुले अग्रभागी असतात.
सर्व जण वाजत-गाजत,नाचत एक ताल सुरात गावाच्या “एकात्मतेचे प्रत्येक ठरणाऱ्या” होळीचा आनंद पावलो,पावली दिसून येतो.श्री स्थापेश्वर मंदिराकडून माऊली मंदिर पर्यंत हे “रोबांट” रात्रीपर्यंत असते.तेथे गावहिताचे गाराणे घालून “धुळ” मारली जाते.
दुसऱ्या दिवशी “न्हावनान”अर्थात ” तिर्थाने” होँळीच्या धुलीवंदनाच्या ५ दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होते
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
*_🛵Deals On आपल्या पसंतीची कोणतीही e -baik एक लाख किंमतीची फक्त १५०००/-रुपयांत🛵_*
● super power electric scooter
● polution Free
● Hig Speef e-baik
● Smiles for miles
*_😱Deals on देत आहे आपल्या पसंतीची कोणतीही टू व्हीलर,फोर व्हीलर.. फक्त ५०टक्के किंमतीत😍_*
*आमचा पत्ता :*
Shop no-4,1st Floor,Aaditya Business Centre Building Gandhi Chowk sawantwadi
*📲Mob : 9421471159 | 9403367839*
_इलेक्ट्रिक गाड्यांची व्हाट्सअप व फेसबुक वर ऑनलाइन जाहिरात करण्यासाठी मुले ,मुली ,पाहीजेत, वेतन ५०००/-ते १०,०००/- रुपये_
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

