युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून एका रुग्णाला १० जणांनी केले रक्तदान…
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालयात प्रसुती दरम्यान एका रुग्णांला तातडीनं ओ पॉझिटिव्ह रक्तगटाची आवश्यकता होती. या रक्तगटाच्या १० रक्त पिशव्यांची गरज असताना युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून एका तासात १० रक्तदात्यांकडून रक्तदान करण्यात आल.
काही दिवसांपूर्वी येथील तृटींमुळे ह्या ब्लड बँकमधून रक्त देण्यास अथवा घेण्यास मनाई करत अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून ब्लड बँक वापरास येऊ नये असे आदेश दिले होते. एलायजा टेस्ट हा मुद्दा यात महत्वाचा ठरला होता. एलायजा टेस्ट शिवाय रक्त न देण्याचे आदेश यावेळी दिले होते. त्यानंतर बल्ड बँक पुन्हा रुग्णसेवेसाठी सज्ज झाल्यानंतर एलायजा टेस्टसाठी बल्ड बँकमध्ये एखाद्या रक्तगटाच्या किमान १० रक्त पिशव्या असणं आवश्यक आहे. त्याशिवाय रुग्णाला रक्त देण शक्य नव्हत. यावेळी बल्ड बँकमधून युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांना याची कल्पना दिली. त्यानंतर एका तासात ओ पॉझिटिव्ह रक्तगटाच्या तब्बल १० जणांनी रक्तदान केल. यात प्रतिक कोरगावकर, प्रकाश चौधरी, उमेश कानविंदे, राघवेंद्र चितारी, प्रथमेश राऊळ, सुमित मळीक, अनिकेत सावंत, भुषण नाईक, कृष्णा कुंभार यांनी रक्तदान करत युवकांसमोर आदर्श निर्माण केला. यामुळे त्या रुग्णाला जीवदान मिळू शकल. सध्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा असून प्रसुती, अतिगंभीर परिस्थिती रक्ताची आवश्यकता असते. एलायजा टेस्ट बंधनकारक असल्यानं रक्तदाते, रूग्णांच्या नातेवाईकांकडून ब्लड बँक सुरू ठेवण्यासाठी सहकार्याची आवश्यकता आहे. रक्त घेत असताना त्या बदल्यात रिप्लेस्मेंट देत सावंतवाडीची ही रक्तवाहिनी पुन्हा बंद होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे असं आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केले आहे.

