कोकणसामाजिक

उमेद अंतर्गत चैतन्य व सातेरी ग्रामसंघातर्फे जागतिक महिला दिन साजरा

 

सावंतवाडी, दि.०९:- उमेद अंतर्गत चैतन्य व सातेरी ग्रामसंघातर्फे कोलगाव निरामय विकास केंद्र येथे मंगळवारी महिला दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी डॉ.वैशाली पडते, पं. समितीच्या स्वाती रेडकर, उमेद चे अभय भिडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी संगीत खुर्ची, बकेट बॉल , पाककला अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.यावेळी सविता कासार, श्रीतिजा धुरी, सिआरपी रश्मी चिंदरकर, मारिया डीमेलो, आरोग्यसेविका सीमा शेरलेकर, प्रिया गावडे तसेच अर्चना सावंत भोसले, रश्मी मोऱ्ये आदी महीला उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!