आरोग्यकोकण

आव्हानांचा सामना केला तरच जीवनात यशस्वी व्हाल : माधुरी शानभाग

_*🛑 आव्हानांचा सामना केला तरच जीवनात यशस्वी व्हाल : माधुरी शानभाग*_

_*🛑 कळसुलकर हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिनाचे आयोजन*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी, दि-०९ :-* आव्हानांचा सामना केला तरच जीवनात यशस्वी व्हाल, प्रत्येकाने वाचन केलेच पाहिजे,वाचन हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका माधुरी शानभाग यांनी केले.
प्रशालेतील मराठी विभाग व संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कळसुलकर हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक शंकांचे समाधान केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशालेतील बालवाडी, प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग तसेच उच्च माध्यमिक विभागातील महिला शिक्षिकांना तुळस रोपे देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका सुनंदा कामत, माजी शिक्षिका पद्मा फातर्पेकर, प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी मीना खानोलकर, प्रशालेचे मुख्याध्यापक एन. पी. मानकर, ज्येष्ठ शिक्षिका व्ही. जी. चव्हाण, ज्येष्ठ शिक्षक एस. एस. वैज, एस. व्ही. भुरे, यु. आर. पाटील, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रसाद नार्वेकर, संचालिका राजश्री टिपणीस, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेतील इयत्ता आठवी मधील विद्यार्थिनी कुमारी स्वरांगी संदीप खानोलकर हिने भरतनाट्यम मधून गणेश वंदना सादर केली. पाहुण्यांचा परिचय प्रशालेतील शिक्षिका श्रीमती एम. एम. कदम यांनी करून दिला. प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक एन. पी. मानकर, सूत्रसंचालन अनिल ठाकूर यांनी तर आभार मराठी विभागप्रमुख श्रीमती व्ही.जी. चव्हाण यांनी मानले. संचालिका श्रीमती राजश्री टिपणीस यांचे कार्यक्रमासाठी बहुमोल सहकार्य लाभले.

*…………….👇👇 बातमीसाठी खालिल लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*_🕴️पाहिजेत… पाहिजेत…पाहिजेत…🕴️_*

*नोकरीची सुवर्णसंधी..😍 सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी😍*

_*🍽️हॉटेल डार्क फॉरेस्ट, आंबोली येथे विविध विभागातील जागा भरणे आहे🏨*_

*▪️रिसेप्शनिस्ट(२ जागा )*
महिला किंवा पुरुष चालेल.पगार १२०००/-( पगार सह जेवण राहण्याची सोय)

*▪️रिझरव्हेशन(१ जागा )*
पगार-१४०००/-(राहण्याची जेवणाची सोय)

*▪️एक्सिकटीव्ह हाऊस कीपर(१ जागा )* पगार-१५०००/-

*▪️रूम बॉय(४ जागा )*
(पगार १००००/-सह जेवण राहण्याची सोय)
*▪️कॅप्टन(१जागा )*
पगार १३०००/- (जेवणाची राहण्याची सोय)
*_संपर्क:-_* *हॉटेल डार्क फॉरेस्ट, आंबोली*
9423251804

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!