क्राइम

गोवा बनावटीच्या चोरट्या ‌दारुच्या वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

 

गोवा बनावटीच्या चोरट्या वहातुकिवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई- गोवा चौपदरी महार्गावर कणकवली गडनदी उड्डान पुलाजवळ सापळा रचुन वहानाची कसुन तपासणी करण्यात येत होती.

गोव्याहुन मुंबई च्या दिशेला जाणारा चाॅकलेटी रंगाचा सहा चाकी एम.एच.४९ ए ३४७१ हा कंटेनर आला असता सिल तोडुन झडती घेतली असता गोवा बनावटीच्या विदेशी मंद्याचे २९५ खोके व बिअरचे ४० खोके सापडुन आल्याने सदतीस लाख चार हजार चारशे रुपये किंमतीची दारु,नऊ लाख रुपये किंमतीचा कंटेनर मीळुन बेचाळीस लाख चार हजार चारशे रुपयांच्या मुद्देमालासह उदयपूर राजस्थान येथील मोहन शंकर जोशी या संशयीतावर कारवाई करुन ताब्यात घेण्यात आले.

सदरची कारवाई अधीक्षक बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रभाकर सावंत,दुय्यम निरीक्षक गणेश जाधव, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुरज चौधरी, महीला जवान श्रीमती स्नेहल कुवेसकर,शिवशंकर मुपडे, जगन्नाथ चव्हाण,वाहन चालक यांनी केली.अधीक तपास दुय्यम निरीक्षक गणेश जाधव करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!