एकांकिका या कला क्षेत्रात तरुणांना संधी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करुया
🛑एकांकिका या कला क्षेत्रात तरुणांना संधी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करुया
🛑जिल्हास्तरीय एकांकिका महोत्सव स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भा.ज.पा.चे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे प्रतिपादन
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी,४-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकांकिका सादर करणाऱ्या संस्था व कलाकार कला जोपासण्याचे काम उत्तम रितीने करत आहेत.त्यांच्यामुळे या कला क्षेत्रात जिल्ह्यातील तरुणांना संधी निर्माण होत आहे. अशा एकांकिका स्पर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. या कलाकारांना आपण सर्वांनी सर्वांनी पाठिंबा द्यायला हवा. एकांकिका कलाकार व त्याचे कुटुंब जगले पाहिजे. या कले मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला फायदा मिळेल यासाठी आपण प्रयत्न करुया. तसेच मळगांव वासियांनी ही कला उत्तम रितीने जोपासली असून कला टिकवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या स्पर्धेत सहभागी संघ व कलाकारांनाही मळगांव वासियांनी प्रोत्साहित करण्यासाठी आपल्या शुभेच्छा आहेत.भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी संलग्न भाजपा चित्रपट कामगार आघाडी अखि राष्ट्रीय सिने कलाकार आणि कामगार संघटनायांच्या माध्यमातून जिल्ह्यात होत असलेले हे आयोजन पहिले आयोजन असून आपल्या शुभेच्छा आहेत, असे प्रतिपादन
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले.
भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी संलग्न भाजपा चित्रपट कामगार आघाडी अखिल राष्ट्रीय सिने कलाकार आणि कामगार संघटना यांच्या वतीने आयोजित भव्य जिल्हास्तरीय एकांकिका महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
मळगांव येथे होत असलेला हा महोत्सव गुरुवार व शुक्रवार या दोन दिवस रंगणार आहे.भाजपा चित्रपट कामगार आघाडी सिंधुदुर्ग च्या माध्यमातून हा महोत्सव होत असून या महोत्सवात 6 दर्जेदार एकांकिका सादर होणार आहेत. मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवच्या भव्य पटांगणावर गुरुवार दिनांक 3 मार्च 2022 व उद्या शुक्रवार दिनांक 4 मार्च 2022 रोजी या दोन दिवस होणार असलेल्या या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या सहीत ,समाजकल्याण सभापती अंकुश जाधव,जि. प.महिला बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर, मळगांव सरपंच स्नेहलता जामदार,उपसरपंच हनुमंत पेडणेकर, सिंधुदुर्ग जिल्हा चित्रपट कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष, भाजपा गितेश शेणई ,कामगार आघाडी महिला जिल्हाध्यक्ष नमिता गावकर, सावंतवाडी तालुका अध्यक्ष मोहन गवस, भाजपा जिल्हा सरचिटणीस अंकीत प्रभु गावकर तसेच रोनापाल सरपंच सुरेश गावडे, माजी सावंतवाडी पं. स. सभापती राजू परब,मळगावचे माजी सरपंच निलेश कुडव, मळगांव पोलीस पाटील रोशनी जाधव, उदय धुरी,मळगांव ग्रामपंचायत सदस्य रत्नमाला तळकटकर, निकिता बुगडे,निकिता राऊळ, सुभद्रा राणे, अनुजा खडपकर, दीपक जोशी, निळकंठ बुगडे, माजी सरपंच निवड प्रमोद गावडे तसेच अंकुश जाधव,चंद्रकांत जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन नितीन नाईक यांनी तर
शेखर पाडगावकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. पाडगावकर यांनी यावेळी उदयोन्मुख कलाकारांना न्याय देणार असे आश्वासन देताना मळगांव ही नाट्य पंढरी असून मळगांव गावाने चित्रपट सृष्टीला शूटींगच्या संधी दिल्या मात्र येथील कलाकारांना डावलून बाहेरील कलाकारांना संधी दिली असल्याची खंत व्यक्त केली.
________________________
*_🛵Deals On आपल्या पसंतीची कोणतीही e -baik एक लाख किंमतीची फक्त १५०००/-रुपयांत🛵_*
● super power electric scooter
● polution Free
● Hig Speef e-baik
● Smiles for miles
*_😱Deals on देत आहे आपल्या पसंतीची कोणतीही टू व्हीलर,फोर व्हीलर.. फक्त ५०टक्के किंमतीत😍_*
*आमचा पत्ता :*
Shop no-4,1st Floor,Aaditya Business Centre Building Gandhi Chowk sawantwadi
*📲Mob : 9421471159 | 9403367839*
_इलेक्ट्रिक गाड्यांची व्हाट्सअप व फेसबुक वर ऑनलाइन जाहिरात करण्यासाठी मुले ,मुली ,पाहीजेत, वेतन ५०००/-ते १०,०००/- रुपये_
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

