केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे हेच केंद्रीय उद्योग मंत्रालयाचे खरे लाभार्थी-परशुराम उपरकर
*🛑 केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे हेच केंद्रीय उद्योग मंत्रालयाचे खरे लाभार्थी-परशुराम उपरकर*
*🛑 क्वायर बोर्डातर्फे उत्पन्नाचे साधन प्रहार भुवनामध्ये सुरू*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🔹कणकवली,दि ३ मार्च*
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे हेच केंद्रीय उद्योग मंत्रालयाचे खरे लाभार्थी ठरले असल्याची टीका मनसे नेते परशुराम उपरकर यांनी आज केली. क्वायर बोर्ड प्रशिक्षण राणे यांच्याच प्रहार भवनमध्ये होत आहे. तर केंद्रातून आलेले अधिकारी हे राणेंच्या हॉटेल आणि त्यांच्या इमारतीचा वापर करत
येथील मनसेचे कार्यात आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. श्री. उपरकर म्हणाले, केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम मंत्रालयाच्या यांच्यावतीने गेल्या महिन्यात काथ्या उद्योग प्रदर्शन आणि प्रशिक्षण सुरू करण्यात आले. क्वायर बोर्डातर्फे कणकवलीतील प्रहार भवनामध्ये तळमजला आणि पहिला मजला भाड्याने घेण्यात आला आहे. यातून नारायण राणे यांनी स्वतःचे उत्पन्न सुरू केले आहे. जिल्ह्यातील नागरिकांना रोजगार मात्र मिळण्याची अशा फारच कमी आहे. कारण काथ्या उद्योग हा वेंगुर्ले मध्ये सुरू आहे. तसे यापूर्वी जिल्ह्यांमध्ये प्रत्येक ५० लाख रुपये प्रमाणे १२ युनिट मंजूर झाली होती. यातील दोनच युनिट सध्या सुरू आहेत. अशी परिस्थिती असताना नारायण राणे यांनी पुन्हा एकदा काथ्या उद्योग येथे सुरू करण्याचा घाट घातला आहे.
मुळात राणेंच्या प्रहार भवनाचे वीज बिल गेले वर्षभर थकीत होते. तब्बल २३ लाख रुपये वीजबिल थकीत असताना त्यातील ३० टक्के रक्कम वीज वितरणच्या निकषाप्रमाणे पहिला हप्ता भरण्यात आला आहे. राणेंनी हे प्रशिक्षण सुरू करत असताना केंद्रातून आलेल्या अधिकाऱ्यांना आपले नीलम कंट्री साईड हॉटेल बुकींग केले. तसेच देवबाग मधील राणेंनी आपल्या हॉटेलमध्येच या अधिकाऱ्यांना ठेवले. मुळात कणकवली आणि ओरोस मध्ये कार्यक्रम होत असताना देवबाग मध्ये अधिकाऱ्यांना ठेवून तेथून भाड्याच्या गाड्या करून झालेला खर्च हा अनाठायी होता. प्रहार भवन हे राणे यांच्या वैयक्तिक मालकीचे आहे. तेथे भाजप विरोधी मंडळी जातील का हाही प्रश्न आहे. त्यामुळे हा उपक्रम नेमका कोणासाठी आहे. याबाबतही प्रश्न पडत आहे. यापूर्वी चांदा ते बांदा योजनेतून क्वार बोर्ड उद्योग हा कुडाळ येथील एमटीडीसीच्या जागेत उभा करण्यात आला होता. तेथे प्रशिक्षण केंद्र होणार होते. मात्र, त्या उद्योग केंद्राची अवस्था वाईट झालेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने राणेंनी काथ्या उद्योग पुन्हा एकदा उभारण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असताना, त्यांनी स्वतःच्या इमारती भाड्याने देण्यासाठी हा सगळा प्रकार केला आहे असे श्री. उपरकर म्हणाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

