आरोग्यसेवेतून माणूसपण जपणारे प्रकाश केळुसकर हे आदर्श कर्मचारी;-वैद्यकीय अधीक्षक डॉ.उत्तम पाटील
🛑सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने ड्रेसर प्रकाश केळुसकर यांचा झाला सेवा निवृत्तीपर हृदय सत्कार
🛑आठवणींना मिळाला उजाळा, पुढील आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥
✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी : दि. ०१ मार्च
शासकीय नोकरीत असतांना आपण समाजाचे सेवक आहोत ही भावना ठेवूनच काम केले पाहिजे.सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी प्रकाश केळुसकर यांनी हा सेवा भाव जपला आणि आरोग्य सेवा दिली.आदर्श आरोग्य सेवक असा असावा याचे प्रकाश केळुसकर हे उत्तम उदाहरण आहेत. हा सेवेचा वास प्रत्येक कर्मचाऱ्याने जपला पाहिजे.असे गौरवोद्गार सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.उत्तम पाटील यांनी काढले.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे व्रण उपचारक प्रकाश उर्फ नाना केळुसकर हे आरोग्य सेवेतून निवृत्त झाले. त्याचा निवृत्तीपर सत्कार समारंभ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.उत्तम पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी वैद्यकीय अधिकारी यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.ज्ञानेश्वर दुर्भाटकर,डॉ. पांडुरंग वजराठकर, हृदयरोगतज्ञ डॉ. अभिजित चितारी, बालरोगतज्ञ डॉ. संदीप सावंत, डॉ. निकीता मसुरकर, डॉ. गिरीश चौगुले,डॉ.निखिल अवधूत,कार्यालयीन अधीक्षक सौ.आशा मिशाळ,मेंटर्न सौ.विजया उबाळे,परिसेविका श्रीमती येळेकर,निवृत्त सिस्टर श्रीमती आरेकर आदी सह सर्व कर्मचारी वर्ग उपस्थितीत होता. यावेळी प्रकाश केळुसकर यांचा शाल, श्रीफळ,भेटवस्तू देऊन निवृत्तीपर सत्कार करण्यात आला.त्याच्या पत्नी सौ.पल्लवी केळुसकर यांचा साडी,चोळी देऊन ओटीभरून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमा दरम्यान केळुसकर कुटुंबियांच्या वतीने आभार व्यक्त करतांना अधीक्षक डॉ.पाटील,डॉ.वजराठकर, सौ.उबाळे,श्रीमती येळेकर,श्रीमती आरेकर सिस्टर यांचा कृतज्ञता म्हणून शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तर कै. आप्पा जाधव यांचे स्मरण म्हणून सिद्धार्थ जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ.पांडुरंग वजराठकर म्हणाले,प्रकाश केळुसकर हे माणसे जोडणारे व्यक्तिमत्त्व आहे.त्याचे काम कृतीतूनच बोलते.स्वतःची जबाबदारी पोळवून दुसऱ्यालाही मदत करण्याची भावना केळुसकर यांच्या कडे आहे.प्रकाश केळुसकर चा कोणत्याही कामाला नाही हा शब्द नसतो.दिलेले काम विश्वासपात्र असेच करायचे.अशा कर्मचाऱ्यांची सेवा जेष्ठतेने होणारी निवृत्ती आरोग्यसेवेत नेहमीच उणीव भासणार आहे.असे डॉ. वाजराठकर म्हणाले.
यावेळी पत्रकार संतोष राऊळ, सौ.पल्लवी केळुसकर, सामाजिक कार्यकर्ते चंदू वालावलकर, प्रवीण चव्हाण, सायली केळुसकर,श्री.सुनील सोनसुरकर,श्रीमती कशाळीकर,विठ्ठल वराडकर यांनी आपले विचार मांडले.तर उपस्थितांचे आभार गौरेश केळुसकर यांनी मानले.
*सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
________________________
*शिल्पग्राम* आता नवीन रूपात….
*_🏘️🏊♂️शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट 🍝🏊♂️_*
*🏊♂️सावंतवाडीत आता रिसॉर्टमध्ये पोहण्याचा आनंद घ्या, आणि आपली मेंबर शिप आजच बुक करा आणि रिसॉर्टच्या कोणत्याही सेवेवर घ्या १०% सूट🥰💵*
*🍽️🥣 मल्टीकूजन रेस्टॉरंट-* घ्या रुचकर इंडियन, चायनीज, तंदुरी, मालवणी व गोवन, जेवणाचा आस्वाद तो हि आमच्या फाईन डाईन रेस्टॉरंटमध्ये……
*🏘️ लक्झरियस रूम्स-* निसर्गरम्य अश्या परिसरात कॉटेजीस मध्ये राहण्याची सर्व सोईंनी सुसज्ज अशी व्यवस्था…….
*🤽♀️🏊♂️ स्विमिंग पूल-* भव्य असे पोहण्यासाठी स्विमिंग पूल ची व्यवस्था जिथे बसून आपल्याला मोकळ्या वातावरणात पुलसाईड डिनरचा आस्वादही घेता येईल. तसेच रात्रीच्या नयनरम्य अश्या वातावरणात पूलसाईड किटी पार्टी, बर्थडे पार्टीसाठी ची चांगली व्यवस्था उपलब्ध….
*▪️ मिटिंग रूम ची व्यवस्था -* २५ ते १०० लोकांची एकत्र बसून बिजनेस मिटिंग,
*_💫गेटटुगेदर किंवा पार्टी करण्यासाठी स्वतंत्र ए. सी व नॉन ए.सी हॉल ची व्यवस्था. आपल्या कार्यक्रमाला द्या आकर्षक भव्यता , वाढदिवस यासारखे भव्य व आकर्षक कार्यक्रम घेण्यासाठी स्वतंत्र मोकळ्या जागेची व्यवस्था….._*
*📲अधिक माहिती साठी संपर्क -* *९१५८७५८७५९ । ७०८०८३२०२०*
*📍पत्ता -* शिल्पग्राम हेरिटेज रिसॉर्ट, खासकीलवाडा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग -४१६५१०
*🌐वेबसाईट-* *www.shilpgramheritageresort.com*
*📧Email-* gmshilpgram@gmail.com
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

