आंबोलीत वायरमन नसल्याने महिनाभर परिसरातील लाईट बेभरवशी..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : केशव जाधव

🎴आंबोली,दि.२३: येथील वायरमन नसल्याने वारंवार विजेचा खेळखंडोबा होत आहे. आंबोली मध्ये गेला एक महिना वायरमन नसल्यामुळे अनेकदा वीज जाण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे लॉकडाऊन मधून नुकतेच सावरत असलेले आंबोलीतील पर्यटन व्यवसायिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांच्याकडून केवळ आश्वासने देण्यात येत आहेत की, आम्ही पंधरा दिवसांमध्ये आंबोलीत वायरमन देऊ परंतु प्रत्यक्षात मात्र कोणतीही कृती झालेली नाही. याबाबत ग्रामस्थांनी वारंवार वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत मागणी करूनही अद्याप पर्यंत ही मागणी पूर्ण करण्यात आलेली नाही. त्यामुळे आंबोली सारख्या पर्यटन स्थळी वारंवार वीज जाण्याचे प्रकार घडत असून पर्यटकांनाही त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत आंबोली ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप असून येत्या काही दिवसात जर वायरमन उपलब्ध करून दिला नाही, तर वीज वितरण च्या कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला आहे.

*_💥साजरी करा ही नवरात्री आणि दसरा उत्सव महाराष्ट्रातील नं.१ मोबाईल चैन SS ‘मोबाईल्स’च्या ‘दसरा ऑफर्स’ सोबत..💥_*

🔥ऑफर फक्त २१ ते २५ ऑक्टोबर पर्यंत..

*💫स्मार्ट फोन्सच्या खरेदी वर चक्क २९९९ रु. पर्यंतची हमखास भेट वस्तू..*
*💫स्मार्ट फोन्स वर चक्क ४० टक्के पर्यंत सूट..*
*💫ब्रँडेड ऍक्सेसरीज वर मिळवा आकर्षक सूट..*
*💫चक्क १० मिनटात लोन वरती फोन..*
*💫स्मार्ट टि.व्ही. फक्त ११९९० रु. पासून..*

🔥तर मग वाट कसली पाहताय! आजच भेट द्या आपल्या 💁🏻‍♂️ *SS COMMUNICATION स्टोअरला..*
*🌐www.ssmobile.com*

*🌈शाखा : सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, रत्नागिरी..*

*🏬Address :* Mudra Commercial Hub, Uchale Compound, Mumbai-Goa road, Kankavali.
*📱Mobile : 7030934427*

*🏬Address :* Patil Towers, Gavali Tittha, Near S.T Stand, Sawantwadi.
*📱Mobile : 7066755656*

*🏬Address :* Shop No, 4, Chintamani Plaza, Near Police Station, Kudal.
*📱Mobile : 8956931120*

*📱Head 0ffice : 8600666111*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!