सत्तेचा उपभोग घेणाऱ्या राजू बेग यांनी सत्तेत असताना काय केल ?.. माजी नगरसेवक टेंमकर
🛑सत्तेचा उपभोग घेणाऱ्या राजू बेग यांनी सत्तेत असताना काय केल ?.. माजी नगरसेवक टेंमकर
🛑केवळ निवडणुका समोर ठेऊन राजू बेग करत आहेत स्टंटबाजी
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,ता१८ :येथील झिंरगवाडी भागातील नागरिकांच्या,झोपड्या आणि मांगराला लावण्यात आलेला ‘स्वच्छता वापर शुल्क’ रद्द करण्यात यावा अशी मागणी मुख्याधिकारी यांच्याकडे करणारे भाजपचे गटनेते माजी नगरसेवक राजू बेग निव्वळ निवडणूका डोळ्यासमोर ठेवून स्टंटबाजी करत आहेत. गेल्या ५ वर्षात त्यांना कधी वॉर्डमधील समस्या दिसल्या नाहीत. सत्तेत असतानाही पाण्यासाठी घागर आंदोलन करायची वेळ गटनेत्यावर आली होती. झिरंगवाडीतला खराब झालेला साधा रस्ता त्यांना सुधारता आला नाही. यातच सर्वकाही स्पष्ट होत असून केवळ निवडणुका समोर ठेऊन राजू बेग स्टंटबाजी करत आहेत. सत्तेत असताना काहीही करू न शकलेल्या राजू बेग यांनी आता जनतेच्या प्रश्नांची काळजी असल्याचा आव आणू नये असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष,माजी नगरसेवक देवेंद्र टेंमकर यांनी लगावला आहे.
येथील नागरीकांच्या घरी घंटागाड्याच जात नाहीत. त्यामुळे आकारण्यात येणारा ‘स्वच्छता वापर शुल्क’ चुकीचा आहे असं राजू बेग सांगत आहेत. मुळात, शासनाच्या धोरणानुसारच शहरात स्वच्छता वापर कर आकारण्यात येत आहे. सत्तेत असताना राजू बेग यावर कधी बोलताना दिसले नाही. गेली अनेक वर्ष ते या ठिकाणी नगरसेवक असताना देखील कचरा प्रश्न सोडा साधी घंटागाडीची सुविधा नागरिकांनी मिळवून देऊ शकले नाहीत. त्यांनीच हे आपल्या निवेदनातून अधोरेखित केले आहे. त्यामुळे सत्तेचा उपभोग घेणाऱ्या राजू बेग यांनी सत्तेत असताना काय केल ? हे जाहिर कराव. रस्ता दुरुस्ती प्रश्न, पाणी प्रश्न हे सोडवू शकले नाही. सत्ताधारी गटनेता असताना देखील पालिकेत जावून घागर बडवायची वेळ त्यांच्यावर आली होती. त्यामुळे आता निवडणूक जवळ येत आहे याची चाहूल त्यांना लागली आहे. त्यामुळेच नागरिकांचे प्रश्न त्यांना आता दिसू लागले आहेत असा जोरदार हल्लाबोल देवेंद्र टेंमकर यांनी केला आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_