मडूरा प्राथमिक शाळेच्या इमारतीत वाळवीची वारुळे
🛑मडूरा प्राथमिक शाळेच्या इमारतीत वाळवीची वारुळे
⚫विद्यार्थ्यांच्या जिवीताला धोका
✍🏻प्रतिनिधी – संजय भाईप
🎴सावंतवाडी:ता१७- मडूरा जि. प. प्राथमिक शाळा नं. १ या प्रशालेच्या भिंतीमध्ये वाळवीची वारुळे तयार झाल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. वाळवी भिंतीतून छपरापर्यंत पोहोचल्याने छप्परही मोडकळीस आले आहे. याबाबत सिंधुदुर्ग जि. प. चा शिक्षण विभाग मात्र निद्रीस्त आहे. प्रशालेकडून वारंवार पाठपुरावा करुनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.
मडुरा जि. प. प्राथमिक प्रशालेची इमारत धोकादायक स्थितीत उभी आहे. एका वर्गखोलीसह पोषण आहाराच्या खोलीत वाळवीची भली मोठी वारुळे तयार झाली आहेत. पाच वर्षांपूर्वीच प्रशाला इमारत निर्लेखित करण्यात आली आहे. धोकादायक इमारतीच्या अहवालामुळे या प्रशालेत मतदान प्रक्रिया राबविली जात नाही. मात्र, विद्यार्थ्यांना बसवून शाळा नियमितपणे सुरु आहे.
प्रशाला स्तरावरुन शिक्षण विभागाकडे या गंभीर प्रश्नांबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेतही या विषयावर चर्चा, ठराव होतात. मात्र, इमारत दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. शिक्षण विभागाचे नियम आड येत असल्याचीही माहिती मिळाली आहे.
प्रशालेत सध्या ४ वर्गखोल्या व पोषण आहार शिजविण्यासाठी खोली आहे. सध्या प्रशालेचा पट २९ असून दोन शिक्षक कार्यरत आहेत. शासन नियमाप्रमाणे दोन शिक्षकांसाठी दोन वर्गखोल्या मंजूर होऊ शकतात. उर्वरित दोन वर्गखोल्यांचे काय करायचे ? असा प्रश्न शाळा व्यवस्थापन समितीसमोर आहे. या सर्व प्रक्रियेत लहान विद्यार्थी मात्र भरडण्याची शक्यता आहे.
येत्या पावसाळ्यापूर्वी इमारत दुरुस्ती न झाल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. वारुळांमध्ये साप राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. इमारत धोकादायक झाल्याने प्रशासन निवडणूक प्रक्रिया घेत नाही. म्हणजे प्रशासनाला एका दिवसासाठी राहणार्या निवडणूक अधिकारी व मतदारांची काळजी आहे. मात्र कायम त्याच धोकादायक इमारतीखाली जीव मुठीत घेऊन राहणार्या विद्यार्थ्यांची काळजी नाही, असा आरोप उपसरपंच विजय वालावलकर व ग्रामस्थ यशवंत माधव यांनी केला आहे.
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

