नगरपंचायत व्यापारी मित्रमंडळामार्फत गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजली अर्पण…
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥
✍️प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव
🎴कणकवली : दि. ०८
नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळामार्फत (जुना भाजीपाला मार्केट) , आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ, आपण आहात म्हणून आम्ही ग्रुप, ॐ नमो भगवते भालचंद्राय ग्रुप यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रध्दांजलीच्या वेळी “मेरी आवाज ही पहचान हैं”, “रहे ना रहे हम महेका करेंगे”, “तुम मुझे युॅं भुला ना पावागे” “सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या”,”अखेरचा हा तुला दंडवत” असे सहजगत्या गाऊन जाणाऱ्या लतादीदी काल गेल्या आणि समस्त भारतीयांना व जगभरातील कानसेन जनतेला वास्तवाची जाणीव झाली. असा सुर व स्वर पुन्हा होणे नाही, असे प्रतिपादन पत्रकार विजय गावकर यांनी केले.
कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनीही आदरांजली वाहताना “लतादीदीचे जाणे तमाम भारतीयांना आपल्या परिवारातीलच कोणी गेले आहे” अशा पद्धतीने जिव्हारी लागले, यातच त्यांचे अलौकिकत्व दिसून येते. जेष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांनी असे म्हटले की, वयाच्या ७ व्या वर्षापासून वयाच्या ९२ व्या वर्षापर्यंत सातत्याने ८५ वर्षे गान रसिकांच्या हृदयावर राज्य करणे ही सोपी गोष्ट नाही. पण लतादीदीनी ते करुन दाखविले आणि सिने संगीताला एक वेगळाच दर्जा प्राप्त करून दिला. भारतीय लोक जीवनातील जीवंत दंतकथा दोन अक्षरांचा दैवी सुर भारतरत्न लतादीदी होत्या, अशा शब्दात राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थित सर्वांनी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली अर्पण केली.
सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/I4y2vaGHgX3BJcpWZe94nr
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

