देवसू येथे बंधाऱ्याचे भुमिपुजन_* ..,………..*_🛑द कॉर्बेट फाऊंडेशन चा उपक्रम_*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी,दि५फेब्रुवारी,:-* देवसू येथे “द कॉर्बेट फाउंडेशन “च्या वतीने बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले. भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम व कॉर्बेट फाऊंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमातून सिंधुदुर्गातील आंबोली पट्ट्यातील अनेक गावांमध्ये लोकसहभागातून एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्पाद्वारे विविध ग्रामिण विकास कामे करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत सक्षमीकरण करण्यासाठी देवसू येथील पलीकडची वाडी मारुती मंदिराजवळ नदीवर बंधारा घालण्याचे नियोजन करण्यात आले असून या कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले. या बंधाऱ्यामुळे देवसू गावातील सुमारे पंधरा एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असून बारमाही शेती करण्यासाठी या पाण्याचा उपयोग होणार आहे. शिवाय आजूबाजूच्या विहिरीतील पाण्याची पातळी देखील वाढणार आहे या भूमिपूजन प्रसंगी अधिक माहिती देताना फाउंडेशन तर्फे आंबोली परिक्षेत्रातील गावांमध्ये पुढील तीन वर्षे या सामाजिक स्वयंसेवी संस्थेकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. याची सुरुवात गावातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना निर्धूर चूल वाटप करून करण्यात आली. याशिवाय शेतकऱ्यांना वन्यप्राण्या पासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी उपाय योजना करणे तसेच गावातील बचत गटातील महिला व युवकांना विविध व्यवसायांचे प्रशिक्षण इत्यादी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या उपक्रमांमध्ये गावच्या नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून ग्रामस्थांच्या सहकार्यातून फार मोठी कामे करण्यात येतील. असे या भूमिपूजनाच्या उद्घाटानावेळी प्रोजेक्ट मॅनेजर राजेश सकट यांनी स्पष्ट केले.यावेळीआंबोली येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत गावडे, आबा गावडे, मिलिंद शेटकर कॉर्बेट फाऊंडेशनचे प्रोजेक्ट मॅनेजर राजेश सकट, अकाउंट अमित अनंत गावडे, समन्वयक रेश्मा बेडेकर, दिशा शेटकर विशाल सडेकर व देवसू गावातील ग्राम विकास समितीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*
*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*
🔸वार्षिक व्याजदर फक्त12%
*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*
*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी
🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस आणि अलाऊन्स*
🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

