कृषिकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

जागतिक पाणथळ दिवसानिमित्त चौकुळ गावात जनजागृती सत्र_* *_🛑”द कॉर्बेट फाऊंडेशन “व स्यामंतक ट्रस्ट चा सहभाग_

 

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी,दि३फेब्रुवारी,:-*
दोन फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून “द कॉर्बेट फाउंडेशन” व “भारतीय राष्ट्रीय भुगतान निगम” यांच्यावतीने चौकूळ येथे जनजागृती शिबिर घेण्यात आले. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी काम करीत असलेल्या “स्यामंतक ट्रस्ट” चेसंस्थापक अध्यक्ष सचिन देसाई यांनी पाणथळ जागां चे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्व व संरक्षण व संवर्धन याविषयी माहिती दिली. कोकणातील विशेषत: चौकुळ व इतर परिसरातील संपन्न नैसर्गिक जैवविविधता व पाणथळ जागांचे महत्त्व समजून घेतल्यास व त्याचे जतन केल्यास पर्यावरण स्नेही पर्यटन पर्यटन विकास करता येईल याचा उपयोग करून स्थानिक ग्रामोद्योग सुरू करून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता येतील व उपलब्ध उत्पादित वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान मिळवून देऊन हा वारसा पुढील पिढीकडे सोपवता येईल .असे विविध मुद्दे सचिन देसाई यांनी उदाहरणासहित विशद केले.स्यामंतक ट्रस्टने मालवण तालुक्यातील धामापूर तलावाला जागतिक वारसा स्थळात स्थान मिळवून देतानाच स्थानिक युवकांना पर्यटन व रोजगार विषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि हे करत असताना आलेले अनुभव व यशोगाथा यादरम्यान त्यांनी स्पष्ट केली. त्यानंतर चौकुळ प्राथमिक शाळेच्या सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी व उपस्थित पालकांनी चौकुळ तळीकडील प्लास्टिकचा कचरा उचलून परिसर स्वच्छ केला “द कॉर्बेट फाऊंडेशन” ही सर्वांगीन ग्रामीण विकास, वन्यजीव व जंगल संवर्धन करणारी एक नामांकित स्वयंसेवी संस्था असून गेल्या 26 वर्षापासून उत्तराखंड ,महाराष्ट्र ,मनिपुर आसाम ,मध्यप्रदेश ,गुजरात ,राजस्थान याठिकाणी विविध प्रकल्प राबवित आहे. सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यातील आंबोली क्षेत्रात 15 गावांमध्ये “लोकसहभागातून संवर्धन“ या तत्वाला अनुसरून भारतीय राष्ट्रीय भुगतान निगमच्या सहकार्याने 2021 पासून प्रकल्प राबवित आहे. शाश्वत रोजगार निर्मिती, शैक्षणिक सहकार्य, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन या त्रिसूत्रीवर एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प आधारलेला आहे. वन्यजीव संरक्षण व संवर्धन या विषयावर गावोगावी जनजागृती शिबिर आयोजित केले जातात.दोन फेब्रुवारी रोजी चौकूळ येथे आयोजित केलेले सत्र हे त्याचाच एक भाग होता.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*

*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*

🔸वार्षिक व्याजदर फक्त12%

*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*

*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी

🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस आणि अलाऊन्स*

🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!