कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 कास ग्रामपंचायत सरपंच खेमराज भाईप यांच्या मनमानी कारभाराला कंटाळुन केलेला अविश्वास ठराव तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी सहा विरूद्ध दोन ने केला मंजुर..

 

_*🛑 उप सरपंच पूर्वा पंडीत सांभाळणार कार्यभार..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍ प्रतिनिधी : संजय भाईप*

*🎴सावंतवाडी, दि-०२ :-* कास ग्रामपंचायत सरपंच खेमराज भाईप यांच्या मनमानी कारभाराला कंटाळुन ऊप सरपंच पूर्वा पंडीत,सदस्य प्रशांत कासकर, राजाराम आळवे नयनी पंडीत,सायली भाईप,पालल सातार्डेकर यांनी तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे अविश्वास ठराव सादर केला होता.अविश्वास ठराव सादर केल्याने कास गावामध्ये चर्चेला उधाण आले होते.ठराव सहमत होणार कि नाही याच्याकडे कास ग्रामस्थाचे लक्ष लागले होते.

अखेर आज तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी कास ग्रामपंचायत मध्ये येवुन चाचपणी करुन अविश्वास ठराव मंजूर केला.सरपंच निवडणूक होईपर्यंत उप सरपंच पूर्वा पंडीत कार्यभार साभांळणार आहेत.यावेळी भा.ज.पा.चे महेश सारंग,बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी,विकी केरकर, पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले,एक.एस.आय पी.एस.माने, सिध्दार्थ माळकर,आर.पी.तेली, पोलीस पाटील प्रशांत पंडीत,ग्रामस्थ देवीदास सातार्डेकर,प्रविण पंडीत, श्रीकांत पंडीत,आत्माराम कासकर,भगवान पंडीत,विठ्ठल पंडीत, समीर किनळेकर,केशव पंडीत.नंदु कासकर,जयवंत पंडीत,बाळु राणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!