🛑 “आरोग्य ही आपली धनसंपदा आहे. तिला योग्य प्रकारे जपले पाहिजे.”; लालू कातळकर
🛑 कोकण लाईव्हतर्फे विशेष मुलाखत
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
✍ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ
🎴सावंतवाडी, दि-०२ :- “शरीर सौष्ठव स्पर्धेला शासन मान्यता मिळायला हवी आसा मानस व्यक्त करताना आरोग्य ही आपली धनसंपदा आहे. तिला योग्य प्रकारे जपले पाहिजे.”असा सल्ला उदयोन्मुख शरीर सौष्ठव पटू तसेच मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव मधील आपले वर्गमित्र, शाळा मित्र व मळगांव मधील युवकांना दिला. कोकण लाईव्हच्या वतीने सावंतवाडी प्रतिनिधी सुखदेव राऊळ यांनी लालू कातळकर याच्याशी संवाद साधला असता, त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव मध्ये वर्ष 2014-15 मध्ये शिकलेल्या व पुढील महाविद्यालयीन शिक्षण श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे —- या शाखेतून पदवीधर झालेल्या लालू कातळकर याने आपण केलेला व्यायाम व आज कमविलेली पिळदार शरीरयष्टी आपणांस पोलीस भरती किंवा भारतीय सैन्य पथकात जाता यावे यासाठीच आपण बनविली आहे. ” असे प्रतिपादन केले. तसेच कातळकर यांनी पुढे बोलताना, ” आपण ही शरीरयष्टी शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठीच नव्हे तर आपणांस सदैव तंदुरुस्त राहता यावे यासाठी बनविली आहे. ” असेही स्पष्ट केले.
तसेच कातळकर यांनी आपल्या शरीरसौष्ठवपटू म्हणून मिळविलेल्या यशाची माहिती देताना, ” आपणांस वर्ष 2019 मध्ये सिंधुदुर्ग श्री गोल्ड मिळाले होते. तसेच आपण वेंगुर्ला टायटल विजेते पद पटकावण्याचा बरोबरच 60 किलो वजनी गटात गोल्ड मेडल प्राप्त केले असल्याची माहिती दिली. तसेच आपण शालेय शिक्षण घेत असताना मळगांव इंग्लिश स्कूल मधून कब्बडी खेळलो. अनेक गाव पातळी सहीत तालुका व जिल्हा पातळीवरील स्पर्धेत खेळताना अनेक स्पर्धेत विजयश्री प्राप्त केली होती. ” अशी माहिती दिली.
यावेळी कातळकर यांनी आपल्या शरीरसौष्ठवपटू करियर बाबत माहिती देताना ,”आपण सध्या टीम शिवाजी जीम मध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत असून आपण सिंधुदुर्ग टायटल विजेता शिवाजी जाधव यांना आपला आदर्श मानत असल्याचे सांगितले. आपल्या भावी संकल्पांबाबत बोलताना, कातळकर यांनी ,”आपण भविष्यात मोठ मोठ्या स्पर्धेत सहभागी होऊन आपले तसेच कुटुंब व शाळा, गाव, तालुका व जिल्ह्याचे नाव मोठे करण्याचा निर्धार केला असल्याचे व शरीरसौष्ठवमध्ये उत्तुंग भरारी घेण्यासाठी आपण खडतर मेहनत व अथक परिश्रमाच्या जोरावर हे यश मिळविले असून वेंगुर्ला श्री चा बहुमान आपल्या साठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे सांगितले.
सावंतवाडी तालुक्यातील मळगांव गावचा सुपूत्र तथा मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवचा विद्यार्थी असलेल्या लालू कातळकर याने ,” आपण वेंगुर्ला नगरपरिषद वेंगुर्ला येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृह कॅम्प या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या वहिल्या वातानुकुलित सभागृहात प्रो. फिटनेस जिम व्यायाम शाळा वेंगुर्ला तर्फे पार पडलेल्या जिल्हास्तरीय वेंगुर्ला श्री शरीर सौष्ठव स्पर्धेत मिळवलेला ‘वेंगुर्ला श्री’ हा बहुमान आपण कधीही विसरणार नाही, आपले जन्म ठिकाण असलेल्या मळगांव मधील ग्रामस्थ तसेच मळगांव
ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य व वर्ग मित्र, शाळा मित्र, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नातेवाईक व अन्य मित्र परिवार, जिम मधील सह शरीरसौष्ठव पटू, शाळा व महाविद्यालयीन शिक्षक-प्राद्यापक, आपले कुटुंबिय हे आपणांस प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
________________________
*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*
*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*
🔸वार्षिक व्याजदर फक्त12%
*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*
*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी
🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस + अलाऊन्स*
👉🏻मग चला वाट कसली बघताय ऊचला📞 फोन आणि संपर्क करा
🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

