🛑 सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा जाहीर झाला पण अजून अपुरे सुविधांचा अभाव
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०१ :-* महाराष्ट्र राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह 1999 मध्ये पर्यटन जिल्हा म्हणून घोषित होऊन या जिल्ह्याला तब्बल बावीस वर्ष पूर्ण झाली . सिंधुदुर्ग जिल्ह्याचे क्षेत्रफळ राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या फक्त 1.7 टक्के आहे. पश्चिमेला पसरलेला अथांग अरबी समुद्र ,पूर्वेला सह्याद्रीच्या रांगा असल्यामुळे या जिल्ह्याला अलौकिक निसर्ग सौंदर्य लाभले आहे. याचमुळे शासनाने हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला आहे सुंदर सागरी किनारे सागरी किल्ला ,जिल्ह्यात साजरे होणारे जत्रोत्सव, दशावतारी नाटक गजा नृत्य, विपुल नैसर्गिक संपदा, आंबोली थंड हवेचे ठिकाण, पावसाळ्यातले धबधबे, गगनबावडा फोंडा तिलारीसारखे नयनमनोहर घाट यामुळे जिल्ह्याचे आकर्षण पर्यटकांना आहे .तरी अद्याप सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा नसल्याने मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात येणारे पर्यटक नाराज होऊन जात असल्याची स्थिती आहे. मात्र याकडे सर्वच राजकीय पक्ष आणि अधिकारी वर्ग आणि सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे .रस्ते राहण्याची व्यवस्था, याच बरोबर बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक असलेली पर्यटनास संदर्भातील माहिती अधिक कोणतीही सुविधा योग्य प्रकारे नसल्याने त्याचा भुर्दंड मात्र जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना होत आहे. यामुळे पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असते. जिल्ह्यातील पर्यटन स्थळे विकसित व्हावीत यांची माहिती देशी-परदेशी पर्यटकांनपर्यंत पोहचावी . जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेत हा उद्देश होता. परंतु प्रत्यक्ष सोयीसुविधा न दिले गेल्यामुळे पर्यटन विकासाची संधी असतानाही विकास होऊ शकला नाही. सागरी महामार्ग हा खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकासाचा मोठा मार्ग आहे. एकशे वीस किलोमीटर लांबीची किनारपट्टी सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभली आहे . किनार्यावरून जो मार्ग गेला आहे तो अरुंद आहे वळणावळणाचा आहे या महामार्गाला सागरी महामार्गाचे स्वरूप देऊन तो वेळेत पूर्ण करावे अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ यांची आहे हा महामार्ग वेळेत पूर्ण केला तर पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचा मार्ग ठरेल अशी पर्यटकांची व स्थानिकांची मागणी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकसित करण्यासाठी सह्याद्री महामार्गाची गरज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचे मध्ये सी-वर्ल्ड प्रकल्प झाला तर तो एक मोठा प्रकल्प होईल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार खारेपाटण दाजीपूर आणि बांदा या ठिकाणची प्रवेशद्वारे माहितीपूर्ण असायला हवीत सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे या जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती दिली गेली तर याचा फायदा पर्यटन विकासासाठी होईल. तसेच पर्यटकांसाठी होईल. शासनाने सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे जिल्ह्यात पर्यटकांना आकर्षित करू शकतील अशी अनेक ठिकाणे आहेत सिंधुदुर्ग विजयदुर्ग मालवण येथील समुद्रातील शिवाजी महाराजांनी बांधलेला प्रसिद्ध सिंधुदुर्ग किल्ला आहे विजयदुर्ग सागर किनारी बांधलेला किल्ला ही पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. आंबोली सावंतवाडी तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगेत आंबोली हे थंड हवेचे ठिकाण आहे . निसर्ग सौंदर्य मालवण वेंगुर्ला तालुक्यातील पर्यटकाना आकर्षित करणारा सुंदर समुद्रकिनारा हा जिल्ह्यात आहे आरवली शिरोडा उभादांडा सागरेश्वर तारकर्ली देवबाग मालवणचा धामापूर तलाव आदि निसर्गरम्य ठिकाणी पर्यटन विकासाला चालना देणारी आहेत.
________________________
*🏝️ हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटीज कंपनी*
खास आपल्यासाठी घेऊन आलेत एक आकर्षक कर्ज योजना, *पाच (५) लाख रुपयापर्यंत 💶💶विनातारण विना गॅरेंटर व्यावसायिक तसेच पर्सनल लोन*
*👉🏻नको तारण*
*👉🏻नको जामीन*
*👉🏻नको CBIL*
🔸वार्षिक व्याजदर फक्त12%
*🟣परतफेड कालावधी ५ वर्षे🟣*
*⚫ आमचा पत्ता-* हिंदुस्तान कॅपिटल सिक्युरिटी
🏬ऑफिस नंबर (४) आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी
🖊️ बँक अकाउंट ओपनिंग कामासाठी मुला-मुलींची आवश्यकता- *पगार-8000 ते 28000 पर्यंत + आकर्षक बोनस + अलाऊन्स*
👉🏻मग चला वाट कसली बघताय ऊचला📞 फोन आणि संपर्क करा
🛑📲अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
——————————————
*📲आमचा संपर्क-9823643211/9403367839*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

