🛑 हिंदु जनजागृती समितीसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
🛑 क्रीडासंकुलाला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव देण्याचे पाप सरकारने करू नये..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचूक बातमी थेट हल्ला
ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सिंधुदुर्ग, दि-२६ :- हिंदूंवर अनन्वित अत्याचार करून हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करणार्या, सहस्रो हिंदु मंदिरे तोडणार्या क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव राज्य शासनाच्या वतीने मुंबईत उभारण्यात आलेल्या क्रीडासंकुलाला देण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. हिंदु जनजागृती समिती या निर्णयाचा जाहीर निषेध करते. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात मोगलांचे उदात्तीकरण करणारा हा निर्णय असून महाराष्ट्र शासनाने क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव क्रीडासंकुलाला देण्याचे पाप करू नये, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धवसाहेब ठाकरे यांना करण्यात आले आहे. या संदर्भात आज हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एक निवेदन मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावे देण्यात आले. या वेळी विक्रोळी येथील श्रीशिवकार्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले, हिंदुराष्ट्र सेना महामुंबईचे साहिल जाधव आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार हे उपस्थित होते. धारावी येथील श्रीराम गणेश मित्रमंडळाचे श्री. कांतीलाल पटेल, हिंदुराष्ट्र सेना महामुंबईचे अध्यक्ष श्री. प्रकाश सावंत, हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हा समन्वयक श्री. सागर चोपदार यांच्या स्वाक्षरीचे हे संयुक्त निवेदन मा. मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले.
गेल्या काही दिवसांत रायगड, विशाळगड, कुलाबा किल्ला आदी अनेक किल्ल्यांवर अनधिकृत थडगी, मजारी आदींच्या माध्यमातून इस्लामी अतिक्रमणे झाल्याचे उघड झाले आहे. त्यात आता शासनाच्या क्रीडासंकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा प्रयत्न होत आहे. आज टिपू सुलतानचे दिले, तर उद्या औरंगजेब, बाबर, खिलजी, गजनी, घौरी आदींच्या नावांनीही शासकीय प्रकल्प येतील. असे होऊ द्यायचे नसेल, तर आताच हे थांबवले पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात इस्लामी आक्रमकांच्या नावे कोणतीही स्मारके असता कामा नये, अशी समस्त हिंदू समाजाची आणि महाराष्ट्रवासियांची धारणा आहे, असे समितीने म्हटले आहे. ठाकरे सरकार एकीकडे ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ करण्याच्या तयारीत असतांना मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख मात्र टिपू सुलतानच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न करत आहेत, हा विरोधाभास आहे. तरी या प्रकरणाची मा. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दखल घेऊन या क्रीडासंकुलाचे नाव बदलावे, अशी कळकळीची विनंती समितीने केली आहे.
________________________
*💼LIC मध्ये RCA नेमणे आहेत!💼*
● जागा -10
● मानधन – 7000 (सध्याची नोकरी किंवा व्यवसाय सोडायची गरज नाही)
● वयोमर्यादा – 21 ते 35 वर्षे
● शैक्षणिक पात्रता – किमान 10 वी पास, 12 वी व पदवीधरांना प्राधान्य
_गृहिणी, महिला बचत गट कार्यकर्ता, सेविका, आशासेविका, पिग्मी एजन्ट, खाजगी नोकरदार, व्यावसायिक, कंत्राटी कर्मचारी, General Insurance एजन्ट._
*💁♂️इच्छुक उमेदवारांनी* https://wa.me/message/IDNBY5YU6FNSO1
*👆वरील link वर क्लिक करुन किंवा 9421082622 या नंबरवर आपले नाव, वय, शिक्षण, गाव व तालुका 🪀WhatsApp करावे.*
💁♂️आपले Application आमच्याकडे
आल्यानंतर आपणास आम्ही संपर्क करू.
*उमेश गावडे : 9421082622*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

