मळगाव माळीच्या घरातील प्रगतशील शेतकरी व भजनी बुवा कै,गोपाळ (दादा)राऊळ
*🛑 मळगाव माळीच्या घरातील प्रगतशील शेतकरी व भजनी बुवा कै,गोपाळ (दादा)राऊळ*
*🛑 बाराव्या दिवशी अनेकांनी वाहिली आदरांजली.. जुन्या आठवणींना दिला उजाळा*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी:-सुखदेव राऊळ*
*🎴 सावंतवाडी,दि,:- १७ जानेवारी*
दादा ! अर्थात कै. गोपाळ वसंत राऊळ! माळीचेघर, मळगांव मधील सुपूत्र! उत्कृष्ट भजनीबुवा तसेच उत्तम शेतकरी व कोणतेही जड-अवजड काम हे केवळ मोबदला मिळविण्याचे साधन न मानता काम हे काम आहे. ते अर्धवट न सोडता पुर्ण केलेच पाहिजे, असे तत्व जोपासून सदैव कामातच व्यस्त राहणारा
कामगार अशी ओळख असलेल्या व मळगांव गावासहित संपूर्ण सावंतवाडी तालुक्यातील जवळ जवळ दशक्रोशीतील गावात गावात ओळख असलेल्या दादाचा बारावा दिवस सोमवारी शोकाकुल वातावरणात पूर्ण झाला. सर्व नातेवाईक, मित्र परिवार, परिचित व माळीचेघर मधील भावकी यांच्या उपस्थितीत पूर्ण झालेल्या या बाराव्या दिवशी दादाच्या पत्नी, मुलगा व मुलगी तसेच त्याच्या भाऊ, वहिनी, पुतणे, पुतण्या यांचे सांत्वन करुन सर्वाँनी धीर दिला.
मितभाषी व शांत स्वभाव असलेल्या दादा याने आपल्या हयातीत एक शेतकरी व कष्टकरी म्हणून वावरताना कोणत्याही प्रकारची मोल-मजूरीची कामे करताना वेळकाढूपणा, कामचुकारपणा, आळस न करता व एकदा कामावर रुजू झाल्यानंतर दिवसभराच्या आठ तासात जबाबदारी व प्रामाणिकपणे ती कामे पूर्ण केली. त्याच्या काही सहकारी कामगारांच्या व काम देणाऱ्यांच्या मते तो एकदा काम सुरु केल्यावर ना कधी बसत असे आणि ना कधी काम संपेपर्यंत थकला तरी काम थांबवून अजिबात बसत नसे. ही जणू त्याच्या कामाची ओळख होय!
विशेषतः दादाची असलेली एक उत्तम भजनीबुवा ही ओळख विशेष असून कामाच्या बाबतीत दादा असलेल्या गोपाळ याने मागील तीन दशकांहून अधिक काळ अर्थात 35 ते 36 वर्षांपासून सूर, ताल व भजन संगीताची जणू आराधनाच केली. तो एकदा भजनमेळात गायला बसला की हार्मोनियम, तबला, टाळ,पखवाज व झांज वादकांनाही स्फुरण चढत असे. इतकेच नव्हे तर भजन ऐकणारे रसिकही मंत्रमुग्ध होऊन जात असत. अनेक वेळा तर दादाच्या सुस्वर स्तरातील भावगीते गजर, गवळणी ऐकण्यासाठी बसलेले श्रोते आपले भान, तहान ,भुक, झोप विसरुन जात असत. तसे दाताचे शिक्षण फारसे झालेले नव्हते. तो फक्त मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव मध्ये इयत्ता सातवी पर्यंत शिकला होता. मात्र त्याचे पाठांतर उत्तम होते.अभंग, गजर असो अथवा गवळणी असोत त्यामधील शब्दांचे उच्चार सुस्पष्ट व कणखर आवाजात असत.इतकेच नव्हे तर आजकालच्या भजनीबुवांप्रमाणे त्याने कधी अभंगाची पुस्तके, वह्या जवळ बाळगल्या नव्हत्या. रेडिओ, टेपरेकॉर्डर, लाऊड स्पीकरवर एक दोन वेळा ऐकलेले अभंगही तो एकाद्या सरावलेल्या गायकाप्रमाणे गात असे व श्रोते वर्गास स्तब्ध व्हायला लावत असे. त्याचे ते भजन गायन आजही अनेकांच्या कानात गुंजत तर आहेतच किंबहुना यापुढेही वर्षानुवर्षे गुंजत राहणार आहे.
शेतकरी कुटुंबात जन्मलेला दादा! अर्थात कै. गोपाळ वसंत राऊळ शेतीशी निगडीत नांगरणी, खुरपणी, पेरणी,मशागत, लावणी, कापणी, झोडपणी,मळणी पासूनची भात उकडणे, सुकवणे अशा जवळजवळ सर्वच कामात तरबेज व मेहनती होता. हे ही नसे थोडके असे म्हणता येईल अशी त्याची शेतीशी निगडीत असलेली प्रत्येक व अन्य बाह्या कोणतीही कामे वाखाणण्याजोगीच असत. ही कामे करताना तो वेळ, शारीरिक थकवा ,आजारपण याची कधीही पर्वा बाळगत नसे. काम आणि दादा हे जणू त्याचे सूत्र बनले होते. मोबदल्याची त्याला अधिक हाव नसे. वयाच्या 16-17 व्या वर्षी त्याने हातात घेतलेले कुदळ, फावडे, नांगर ,कोयता व शेतीशी संबंधित कुठलेही अवजार त्याने वापरले नसेल असे झालेच नाही. इतकेच नव्हे तर घर उभारणी, बांधणी,कौलांची लावणावळ , साफसफाई, परतणी, माती खोदकाम, दगड , चिरे ने-आण या कामांसहित जमीन बनवणे, भिंतीचे रंगकाम, सिमेंट-रेती एकत्रीकरण यासारख्या सर्वच कामांबरोबरच शौचालय, गोबरगॅस बांधण्यातही दादा निष्णात होता. थोडक्यात आमचा दादा कामाचा, श्रमाचा पुजारी व भक्तच होता. तो कधी शहराकडे नोकरीच्या मागे धावला नाही. आपले घर, वाडी, गाव किंवा दशक्रोशीच्या आसपास काबाडकष्ट करत राहिला. त्याची राहणी साधी होती. इतरांसारखी सुटाबुटातली किंवा शहरी नसली तरी टापटीप असायची. दादाची वर्तणूकही आदर्श अशीच होती. यामुळे तो कायम लक्षात राहिल.
एक उत्तम भजनीबुवा असलेल्या दादाने मागील गणेशोत्सवापर्यंत केलेल्या भजनांसहित मागील अनेक वर्षातील भजनांमध्ये त्याने गायलेल्या अभंगामध्ये “तुच गजानन तुच साई “, “अभिर गुलाल उसळीत रंग”, ” आज मी ब्रम्हरुप पाहिले”, “पायी शिर्डीला येतो साईनाथा”, “तुझी सेवा करीन मन भावे ” आदी अभंगाचा समावेश आहे. तसे पाहिल्यास दादाने यापेक्षाही अधिक अभंग आपल्या सुस्वर आवाजात सूर, ताल व संगीतबद्ध केले आहेत. त्यातील हे काही निवडक आहेत. दादाने केलेल्या भजनावेळी त्याला हार्मोनियमची साथ दिलेले माळीचेघर मधील हार्मोनियम वादक सत्यवान राऊळ, रामचंद्र उर्फ नाना राऊळ, विलास राऊळ, राघोबा राऊळ , सुदेश राऊळ,सचिन राऊळ तसेच तबलाची साथ दिलेल्यांमध्ये बाळकृष्ण उर्फ आबा राऊळ, रामचंद्र राऊळ, हरिश्चंद्र राऊळ, विलास राऊळ व दिलीप राऊळ, सोनल राऊळ, देविदास राऊळ आदींचा समावेश आहे. तर मृदुंग वादकांमध्ये संदीप राऊळ याचा समावेश आहे.तर गोपाळ उर्फ दादा तसेच दादाचे मोठे बंधू सुरेश राऊळ ऊर्फ भाई यांच्या पावलावर पाऊल ठेवून मागील दहा वर्षात माळीचे घर च्या आधुनिक भजन मंडळाची जबाबदारी समर्थपणे संभाळत असलेल्या दादाचा पुतण्या सुदेश राऊळ याच्यासोबत सदाशिव राऊळ,प्रणय राऊळ ,आदित्य राऊळ हे झांज वादक म्हणून तर सुमेश राऊळ,विनायक राऊळ, विशाल राऊळ, गंगाराम राऊळ, घन:श्याम राऊळ, देवेंद्र राऊळ, भुवन राऊळ, हरिश्चंद्र राऊळ, सौरभ राऊळ, परशुराम राऊळ ,ऋतिक राऊळ, विघ्नेश राऊळ, पुरुषोत्तम राऊळ, प्रशांत राऊळ, उदय राऊळ , गणपत राऊळ,हरीश राऊळ हे कोरसमणी आहेत.
थोडक्यात शेतकरी,कष्टकरी व भजनीबुवा असलेल्या कै.दादा ची उणीव पुढील काळात जाणवणार असून तो भजन रसिकांच्या आठवणीत राहिल यात शंका नाही. कै.गोपाळ वसंत राऊळ उर्फ दादा याच्या पश्चात त्याची पत्नी प्रियांका गोपाळ राऊळ, कन्या अंजली व मुलगा गौरेश राऊळ,मोठा बंधू सुरेश राऊळ,धाकटा बंधू शरद राऊळ विवाहित बहिण लता राऊळ (उर्फ काशीबाई अनंत धुरी) व वहिनी सुवर्णा सुरेश राऊळ , शिवानी शरद राऊळ,पुतणे सुदेश,सुमेश, विनायक,विशाल राऊळ तसेच चुलत काकी गं.भा. वंदना नामदेव राऊळ,चुलत बंधू स्वप्निल नामदेव राऊळ व संदेश नामदेव राऊळ,चुलत वहिनी संजल स्वप्निल राऊळ,शिल्पा संदेश राऊळ, चुलत पुतण्या साईश ,चुलत पुतणी सृष्टी व श्रावणी असा मोठा परिवार आहे. 14 जून 1968 साली जन्मलेल्या दादा याचे निधन 6 जानेवारी 2022 रोजी वयाच्या 54 व्या वर्षी अल्पश: आजाराने गोवा, बांबोळी रुग्णालय येथे झाले असून माळीचेघर मधील सर्व राऊळ कुटुंबीय,नातेवाईक व सर्व मित्र परिवारातील त्याचे चाहते त्याची पत्नी व मुलांच्या दु:खात सहभागी आहेत.आज सोमवार दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी कै. गोपाळ ऊर्फ दादाचे बारावे आहे.दादा यास माझ्या सहीत माझे सर्व पत्रकार मित्र व सहकारी तसेच माझे व शरद राऊळ याचे एस. एस. सी. चॅम्पियन्स गृप 1987-88 मधील वर्ग मित्र व कै. गोपाळ (दादा) याचे मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव मधील वर्ग मित्र व सर्व शाळा मित्र , मळगांव इंग्लिश स्कूल मळगांव मध्ये इयत्ता दहावीत शिकत असलेली त्याची मुलगी अंजली व इयत्ता चौथीत शिकत असलेला मुलगा गौरेश याचे वर्ग व शाळा मित्र कै. दादाच्या निधनाने शोकाकुल आहेत.या सर्वांतर्फे तसेच माझ्या सहित माझ्या सर्व कुटुंबिय व संपूर्ण माळीचेघर परिवारातील सदस्यांतर्फे दादा यास पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली!!!
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*_🥻😍शेकडो कपड्याच्या व्हरायटी… आपल्या खिश्याला परवडेल… असे कपड्यांचं एकमेव दालन_*
_*👕🥻Sun Dali👕🥻*_
_*कलेक्शन*_
_*लेडीज & किड्स वेअर*_
◆ साडी
◆फॅशनेबल कुर्ती
◆ड्रेस मटेरीयल
◆वेडिंग वेअर
◆लेहंगाज
◆लेगिन्स
◆ किड्स वेअर
*♦️स्टायलिश कपड्यांसाठी फक्त सन डालीच हवी*
_प्रोप्रा. मिसबा शेख_
_संचयनी पॅलेसच्या अपॉझिट_
_सालईवाडा, सावंतवाडी_
📱 _*संपर्क :*_ 9833142888
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

