कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

महाविकास आघाडीचे तीन संचालक फुटीच्या उंबरठ्यावर

🛑महाविकास आघाडीचे तीन संचालक फुटीच्या उंबरठ्यावर

🛑जिल्हा बँक निवडणुकीत राणे कुटुंबियांना टार्गेट केल्याचा वचपा काढणार

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

✍️ ब्यूरो न्युज:-कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,दि,६:- ‌जिल्हा बँकेची निवडणूक आरोप प्रत्यारोपाने गाजली, महाविकास आघाडीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला,मात्र विरोधकांनी आखलेला चक्रव्यूह भेदण्यात नारायण राणे यशस्वी झालेत १९ पैकी अकरा संचालक निवडून आणले व आता एवढ्या वरच न थांबता महाविकास आघाडीचे तीन संचालक भाजपच्या गळाला लावण्यात नारायण राणे यशस्वी झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी जिल्हा बँकेतील काही स़चालक चुकीचे काम करणार नाहीत ते सतीश सावंत यांच्या सारखे बाहेर पडून आम्हाला येऊन मिळतील असा विश्वास व्यक्त केला होता, त्याला काही दिवस उलटायच्या आतच नारायण राणे यांनी असे काही फासे टाकले की त्यात महाविकास आघाडीचे तीन संचालक अडकल्याचे वृत्त आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात नारायण राणे यांचा करीष्मा आजही चालतो हे अनेक वेळा दिसून आले आहे,ज्या ज्या वेळी नारायण राणे यांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न होता त्या, त्या वेळी ते अधिक जोमाने ते पेटुन उठतात व विजयश्री खेचून आणतात,त्याचेच प्रत्यंतर जिल्हा बँकेत आले.
जिल्हा बँक निवडणुकीत ज्या पध्दतीने राणे कुटुंबियांना टार्गेट करण्यात आले त्याचा वचपा काढण्याचे राणे कुटुंबियांनी ठरवले असून त्याची सुरुवात महाविकास आघाडीच्या संचालकांना आपल्या तंबूत घेऊन करणार असल्याचे समजते, यासाठी राणे यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे व त्यात काही मासे गळाला लागल्याचे वृत्त आहे.

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!