झारखंडमधील पाकुर येथील अम्पाडा पोलीस स्टेशन हद्दीतील पडेरकोला गावाजवळ गॅस सिलिंडर नेणाऱ्या ट्रकने प्रवासी बसला दिली धडक…
🛑१७ जणांचा मृत्यू ; तर २५ जण जखमी झाले आहेत
🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴झारखंड : दि. ०६ जानेवारी – मधील पाकूर येथील अम्पाडा पोलीस स्टेशन हद्दीतील पडेरकोला गावाजवळ गुरूवार दि. ०६ रोजी सकाळच्या सुमारास गॅस सिलिंडर नेणाऱ्या ट्रकने प्रवासी बसला धडक दिली.
यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर २५ जण जखमी झाले आहेत. दरम्यान जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
झारखंडच्या पाकूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित कुमार विमल म्हणाले की, अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दहा जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात अन्य २५ जण जखमी झाले असून त्यापैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
भरधाव ट्रक आणि गॅस सिलिंडर घेऊन जाणारी बस यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. बस आणि एलपीजी सिलिंडरने भरलेल्या ट्रकची समोरासमोर धडकेची भीषणता अतिशय भयानक होती. मात्र सुदैवाने सिलिंडरचा स्फोट झाला नाही. मृतांमध्ये बहुतांश बस प्रवासी आहेत. तर जखमी अवस्थेत असलेल्या लोकांचा स्थिती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, बस अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे मला खूप दुःख झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना.
सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇👇
*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*
*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी
*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*
*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*
*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*
*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

