कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

जे शिवराम भाऊ जाधव यांचे नाव घेऊन मते मागतात, त्यांनी त्यांना बदनाम करुन सत्ता भोगली होती ,-परशुराम उपरकर

*🛑 जे शिवराम भाऊ जाधव यांचे नाव घेऊन मते मागतात, त्यांनी त्यांना बदनाम करुन सत्ता भोगली होती ,-परशुराम उपरकर*

*🛑यापुढे जिल्हा बँकेवर मनसे ठेवणार करडी नजर*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*

*🎴 सावंतवाडी,दि,:- २७ डिसेंबर*
जिल्हा बँक निवडणुकीत केंद्र व राज्यातील मंत्री एकमेकांसमोर उभे ठाकून बँक ताब्यात घेण्यासाठी भांडत आहेत,दोन्ही पॅनल मधून उभे राहिलेले उमेदवार या बँकेचे संचालक होते, त्यांनी संचालक असताना बँकेचे केलेले व्यवहार जनतेसमोर आहेत, त्यामुळे मतदारांनी यांना मतदान करताना आता दिलेल्या आश्वासनांची कात्रणे जपून ठेवावी असा सल्ला माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत दिला
कॉलेजला दिलेले १५ कोटीचे कर्ज ,बलेरो गाडीला एका दिवसात दिलेले कर्ज हे सर्व व्यवहार दोन्ही पॅनलच्या संचालकांच्या संमतीने त्यावेळी झाले होते व काही कर्ज चुकीच्या पद्धतीने दिले गेल्याचा आरोप आमदार परशुराम उपरकर यांनी केला.
बिल्डर लोकांना शेतीच्या नावाखाली कर्ज देऊन त्याचा उपयोग दुसरीकडेच केला गेला या बँकेत असलेल्या शासकीय निधी व शासकीय फंड वगळला तर या बँकेच्या अवस्था काय होईल असा प्रश्न उपरकर यांनी केला आहे. सध्याचे उमेदवार जिंकण्याची दावे व खोटी आश्वासने देत आहेत दूध संकलनासाठी संचालकांनी काय प्रयत्न केले, किती पतन खाल्ली कारखाने काढलेत ते स्पष्ट करावे अशी मागणी केली.
ज्या शिवराम भाऊ जाधव यांचे नाव ही मंडळी घेत आहेत,त्यांनी यापूर्वी शिवराम भाऊ जाधव यांना बदनाम करून सत्ता मिळवली होती असा आरोप उपरकर यांनी केला, त्यामुळे जिल्हा बँकेत मतदान करताना सभासदांनी सारासार विचार करून मतदान करावे असे आवाहन उपरकर यांनी केले आहे.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

*_🥻😍शेकडो कपड्याच्या व्हरायटी… आपल्या खिश्याला परवडेल… असे कपड्यांचं एकमेव दालन_*

_*👕🥻Sun Dali👕🥻*_
_*कलेक्शन*_

_*लेडीज & किड्स वेअर*_

◆ साडी
◆फॅशनेबल कुर्ती
◆ड्रेस मटेरीयल
◆वेडिंग वेअर
◆लेहंगाज
◆लेगिन्स
◆ किड्स वेअर

*♦️स्टायलिश कपड्यांसाठी फक्त सन डालीच हवी*

_प्रोप्रा. मिसबा शेख_
_संचयनी पॅलेसच्या अपॉझिट_
_सालईवाडा, सावंतवाडी_

📱 _*संपर्क :*_ 9833142888

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!