कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 वेंगुर्ले नगराध्यक्ष चषक जिल्हास्तरीय खुल्या बुदधिबळ स्पर्धेत सावंतवाडीचा कु.बाळकृष्ण पेडणेकर विजेता..

 

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचूक बातमी थेट हल्ला

✍ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी, दि-२१ :- नगरपालिकेने स्वच्छता अभियानांतर्गत आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय खुल्या बुदधिबळ स्पर्धेत सावंतवाडीचा सतरा वर्षीय राष्ट्रीय बुदधिबळ खेळाडू कु.बाळकृष्ण पेडणेकर याने खुल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला.चौदा वर्षांखालील गटात मुक्ताई अॅकेडमीचा कु.आयुष राठोड याने प्रथम क्रमांक मिळवला.या स्पर्धेत जिल्ह्यातील 62 खेळाडू सहभागी झाले होते.मुक्ताई अॅकेडमीच्या विदयार्थ्यांनी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.अॅकेडमीच्या चार विदयार्थ्यांनी पारितोषिके मिळवत जिल्ह्यात आपला दबदबा कायम ठेवला.खुल्या गटात कु.बाळकृष्ण पेडणेकर याने निर्विवादपणे सहा राउंड्समध्ये सहा पाॅईंट्स मिळवत आपला विजय साजरा केला.चौदा वर्षांखालील गटात मुक्ताई अॅकेडमीच्या कु.आयुष राठोड याने प्रथम, कु.भावेश कुडतरकर याने दुसरा आणि कु.विभव राऊळ याने तिसरा क्रमांक मिळवला.

सावंतवाडीत घेण्यात आलेल्या एकोणीस वर्षे वयोगटातील जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेत देखील सर्व गटात मुक्ताई अॅकेडमीच्या विदयार्थ्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले.स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी कु.बाळकृष्ण पेडणेकर सोबत कु.भावेश कुडतरकरने दुसरा आणि कु.आयुष राठोडने चौथा क्रमांक मिळवला.इतर गटात 11 वर्षे मुले प्रथम कु.वरद कामत, 13 वर्षे मुली द्वितीय कु.भुमि कामत, तृतीय कु.सौम्या हरमलकर, 15 वर्षे मुले प्रथम कु.राजेश विरनोडकर, तृतीय कु.स्वानंद जोशी, 19 वर्षे मुली प्रथम कु.पल्लवी निरावडेकर, 19 वर्षे मुले प्रथम कु.मनिष निरावडेकर या मुक्ताई अॅकेडमीच्या विदयार्थ्यांनी पारितोषिके मिळवली.

राणीसाहेब श्रीमंत शुभदादेवी भोंसले आणि युवराज श्रीमंत लखमराजे भोंसले यांनी अॅकेडमीच्या विदयार्थ्यांचे अभिनंदन करताना विदयार्थ्यांना आणि अॅकेडमीचे संचालक श्री.कौस्तुभ पेडणेकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

 

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

 

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*

*▪️व्हाईट फॉरेस्ट*

*▪️पायनॅपल*

*▪️बटरस्कॉच*

*▪️मॅंगो*

*▪️स्ट्रॉबेरी*

*▪️ब्लॅक करंट*

*▪️चॉकलेट क्रीम*

*▪️रसमलाई*

*▪️फोटो केक*

*▪️स्पेशल थीम केक*

*▪️पिनाटा केक*

 

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_

*संपर्क:-* *सुरज लाड*

बिरोडकर टेंब सावंतवाडी

7307367856/7385501506

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!