कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

नागरिकांची आंदोलने, उपोषणे,आणि ठेकेदाराला तोंड दाबून बुक्क्याचा मार

.*🛑नागरिकांची आंदोलने, उपोषणे,आणि ठेकेदाराला तोंड दाबून बुक्क्याचा मार*

*🛑सार्वजनिक बांधकाम विभाग सुशेगाद असल्यानेच नागरिकांना करावी लागतात आंदोलने, उपोषणे*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ ब्यूरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग:-*

*🎴सावंतवाडी,दि,:-१७ डिसेंबर*
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे बहुतांशी आंदोलने ,उपोषणे होत आहेत,व याचा फटका फक्त नागरिकांनाच नाही तर त्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराला ही बसत आहे, त्याला या सर्व प्रकरणात तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत असल्याचे चित्र सध्या सार्वजनिक बांधकाम विभागात निर्माण झाले आहे.
काही ठेकेदाराने आपली कामे दोन वर्षांपूर्वी पूर्ण करूनही अद्याप त्या कामाची बिलं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळाली नाहीत ,किंवा शासनाकडे एवढ्या कामांची पूर्तता झाली, त्यासाठी एवढा निधीची आवश्यकता आहे आहे अशी लेखी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली गेली नाही, त्यामुळे बांधकाम विभागाकडे ठेकेदारांचे पैसे मोठ्या प्रमाणात अडकून पडल्यामुळे ठेकेदारांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
गेल्या दोन वर्षात कोरोना कळात मोठ्या प्रमाणात निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आला नाही, तरीही ठेकेदार बारीक-सारीक काम करत होते, आपल्याकडे असलेले मजदूर, अनेक,वाहने आणि बँकेचे हप्ते हे सर्व सुरळीत चालण्यासाठी कामे घेणे गरजेचे असते म्हणून अशी मोठी कामे ठेकेदार घेत गेले व बांधकाम विभागाच्या चक्रव्यूहात अडकले, त्यांना आता त्यातुन बाहेर पडणे मुश्कील झाले आहे.
बांधकाम विभागाचे अधिकारी म्हणतात ठेकेदाराने ठेका घेतला तर तो पूर्ण केला पाहिजे, मात्र त्या ठेकेदाराचे पैसे देणे गरजेचे आहे की नाही यावर काही बोलत नाहीत, ठेकेदारांकडून अत्यावश्यक खाली तातडीने लाखो रुपयांची कामे करून घेतली जातात मात्र ती कामे होऊन वर्ष झाले तरी त्याची वर्क ऑर्डर ठेकेदारांला मिळत नाही,त्यामुळे ठेकेदारांवर कर्ज‌ बाजारी होण्याची वेळ आली,मात्र याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कोणतेही सोयरसुतक नसल्याचे दिसून येते, जनता फक्त सारासार विचार करताना ठेकेदाराने भरपूर पैसा कमावला असाच विचार करते मात्र ठेकेदाराने ठेका घेतल्यानंतर त्यात काय, काय गमावले याचा विचार कोन करत नाहीत ,परंतु जावे त्याच्या वंशी त्याला ते कळावे या उक्तीप्रमाणे ठेका घेतलेल्या ठेकेदाराला त्यातील काय मरण असतात हे चांगले समजू शकत, त्यामुळे अनेक भागात अर्धवट कामे राहिली व ती कामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदार असमर्थ आहे असा त्याचा अर्थ नाही तर बांधकाम विभागाच्या या अनागोंदी कारभारामुळे अडचणीत सापडतो व त्यातूनच ती कामे अर्धवट राहतात हे माहिती घेतल्यानंतर सिद्ध झाले आहे.
त्यामुळे बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता नवीन पदभार घेतलेल्या अनामिका चव्हाण यांनी याबाबत लक्ष घालून प्रलंबित बिले मार्गी लावावी तरच ठेकेदार अपुर्ण कामे मार्गी लावतील व लोकांच्या रोषाला बांधकाम विभागाला सामोरे जावे लागणार नाही.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*_🍦🍧लग्न,समारंभासाठी फ्राँस्टी कंपनीचे आईस्क्रीम घ्या अगदी माफक दरात🍧🍦_*

*🍦नित्या एजन्सी🍦*
भटवाडी ता.सावंतवाडी

*🟣खास म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही फ्री सर्व्हीस ची सोय*

*🟣आईस्क्रीम चे विविध फ्लेवर स्कुपिंग,स्लाईस व कपमध्ये उपलब्ध*

*🟣कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाच्या ठिकाणी टापटिप आणि उत्कृष्ट सर्व्हीस*

*होलसेल आईस्क्रीम चे अधिकृत विक्रेते*
प्रोप्रा.अनिल-9011183285
सुनील-7709280101
रुपेश-9307046211
रवी जाधव-9405264027

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!