कोकणरत्नागिरीराजकीय

विधान परिषदनेत्यांचा चिपळूण बचाव समिती मोर्चाला पाठिंबा

 

चिपळूण (ओंकार रेळेकर) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ब प्रवीण दरेकर यांनी चिपळूण बचाव समितीच्या वतीने सुरू असलेल्या गाळ काढा चिपळूण वाचवा या साखळी उपोषण आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला असून तशा आशयाचे पत्र समितीकडे दिले आहे. यावेळी समितीच्या शिष्टमंडळाशी बोलताना माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आपण उपोषणस्थळी भेट देवून चर्चा करू अशीही माहिती त्यांनी दिली.*

चिपळूणकरांची ही बिगर राजकीय चळवळ कौतुकास्पद असून चिपळूण शहराला वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने चिपळूणकर या आंदोलनात सहभागी झाले आहेत, त्याचा प्रतिसाद पाहता चिपळूणकराना न्याय मिळालाच पाहिजे व त्यासाठी आपण व आपला पक्ष निश्चितच बरोबर राहू अशी ग्वाही दरेकर यांनी यावेळी बचाव समितीचा दिली.
चिपळूण बचाव समितीच्या या आंदोलनाची माहिती घेण्यासाठी व एकूणच पुराबाबतच्या समस्या बाबत चर्चा करण्यासाठी भारतीय भाजपाच्या वतीने माजी आमदार व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी चर्चेसाठी बोलावले होते. त्यानुसार समितीचे अरुण भोजने, सतीश कदम, राजेश वाजे व शहानवाज शहा,किशोर रेडीज यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी आमदार व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड व माजी आमदार प्रमोद जठार हे उपस्थित होते. यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की आपली मागणी अत्यंत योग्य असून शहराला वाचवण्यासाठी गाळ काढवाच लागेल व आपण याबाबत सरकारचे लक्ष निश्चितच वेधू व यासाठी भाजपा या लढ्यात आपल्यासोबत आहे. दरम्यान, आमदार प्रसाद लाड हे दोन दिवसांमध्ये उपोषणस्थळी भेट देणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. तसेच त्यानंतर विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेवून उपोषणस्थळी भेट देणार असल्याचेही सांगण्यात आले.या भेटीदरम्यान चिपळूण बचाव समितीचे वतीने दरेकर यांना निवेदन व संपूर्ण गाळा संदर्भातल्या विषयाची माहिती असलेला समितीचा अहवाल देण्यात आला
फोटो : बचाव समिती पदाधिकारी किशोर रेडीज याच्याकडे पाठींबा चे पत्र देतांना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ,आमदार प्रसाद लाड,प्रमोद जठार,नगरसेवक निशिकांत भोजने,अरुण भोजने, राजेश वाजे छायाचित्रात दिसत आहेत (छाया :ओंकार रेळेकर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!