आणखीकोकणसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मळगाव देवस्थानात बसली मांजरी; दोन दिवस, तीन रात्रींचा देवांच्या विश्रांतीचा कालावधी

🛑मानकऱ्यांसहीत सर्व गाव एकोप्याने जपत आलेली परंपरा

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥

✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी : दि. ०६ डिसेंबर – मळगाव गावच्या “मांजरी” या आगळ्यावेगळ्या परंपरेस रविवार मध्यरात्रीपासून सुरूवात झाली आहे. मांजरी ही दोन दिवस आणि तिनं रात्रींची असते. गावातील देवांचा विश्रांती घेण्याचा हा कालावधी असतो. या कालावधीत गावात मंदिरातील देवाची तसेच घरच्या देवाचीही पूजा केली जात नाही. मांजरी उठेपर्यंत गावात कोणतेच धार्मिक कार्य केले जात नाही. हजारो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा गावातील मानकऱ्यांसहीत सर्व गाव एकोप्याने जपत आले आहे.

या दिवसात देवाला दिवाही लावला जात नाही. देवाची घंटा वाजवली जात नाही. तसेच गावात इतर कुठलेही वाद्य वाजविले जात नाही. या काळात गावातील व्यक्ती कामानिमित्त गावाबाहेर जाऊ शकते, पण सायंकाळी पुन्हा गावात याव लागत. जर एखादी व्यक्ती या काळात गावाबाहेर राहिली तर मांजरी उठेपर्यंत तीन दिवस गावात येऊ शकत नाही. जर कोणाला गावाबाहेर जायच असल्यास आणि दोन दिवस रहायच असल्यास त्याने मांजरी बसायच्या आधी बाहेर गावी जायचं ते तिसऱ्या दिवशी मांजरी उठल्यावर यायच, अशी रित आणि देवाचं बंधन आहे, तिसऱ्या रात्रीच्या पहाटे मंदिराच्या पायरीवर देवाचा वाघ येऊन तीन डरकाळ्या फोडतो. तसेच आपल्या शेपटीने अंगण साफ करून निघुन जातो. त्यानंतर अवसार उभे राहून मांजरी उठल्याचा कौल दिल्यावर तिसऱ्या दिवशी पहाटे मांजरी उठवली जाते. मांजरी उठल्यावर मंदिर परिसरात झाडलोट केली जाते. त्यानंतर गावातील सर्व धार्मिक कार्यांना पुन्हा एकदा सुरुवात होते. ज्या दिवशी मांजरी उठते त्याच दिवशी श्री देव मायापूर्वचारी देवाचा जत्रोत्सव होतो तर दुसऱ्या दिवशी श्री देव भूतनाथ देवाचा जत्रोत्सव होतो.

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी रविवार मध्यरात्रीपासून मांजरीस सुरुवात झाली असून, दोन दिवस आणि तिन रात्रींनानंतर बुधवारी पहाटे मांजरी उठणार आहे. त्यानंतर मायापूर्वचारी जत्रोत्सव बुधवारी ८ डिसेंबर रोजी तर भूतनाथ जत्रोत्सव गुरुवारी ९ डिसेंबर रोजी होणार आहे. अशीही मळगाव गावची आगळी वेगळी ‘मांजरी’ ची प्रथा गाव एकोप्याने जपत आल आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 👇👇

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!