कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिकसिंधुदुर्ग

मालडी येथे हरीनाम सप्ताह उत्साहात संपन्न

*🛑मालडी येथे हरीनाम सप्ताह उत्साहात संपन्न*

*🛑 मोठ्या प्रमाणात भाविकांनी लावली हजेरी*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्यूरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 मालवण-मालाडी :३ डिसेंबर*
मालडी गावचे ग्रामदैवत श्री भावई देवी मंदिरात सालाबाद यावर्षीही हरीनाम सप्ताह 30नोव्हेंबर व 1 डिसेंबर रोजी अमाप उत्साहात भक्तिमय वातवरणात संपन्न झाला.हरीनाम सप्ताहात मोठ्या संख्येने माहेरवाशिणी,ग्रामस्थ ,भाविक यांची उपस्थित होते
.गतवर्षी करोना महामारी प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर गावी उत्सवास न येता आलेले चाकरमानी यावर्षी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई तसेच हरीनाम सप्ताहाची सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
हरिनाम सप्ताहाची सुरुवात 30 नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता झाली. यावेळी देवीची पूजा अभिषेक करून सारे विधी झाल्यावर देवीला मुकुट, साडी व दागिने घालून सजवली जाते.सकाळी मंत्रघोषात हरीनाम सप्ताह सुरू झाल्यावर देवीची आरती म्हणून सात प्रहराचा हरीनाम सप्ताह सुरू झाला.हरीनाम सप्ताह सुरु झाल्यावर देवींची खणानारळानी ओटी भरण्यासाठी सुहासिनीची रांग लागते. अनेकजण नवस फेडण्यासाठी येतात. या वर्षी जवळपास 20/22 भजनमंडळानी आपापले नृत्यविष्कार सुश्राव्य अभंगा वर ह र्मो नियम च्या तालावर आणि टाळ मृदुंगाच्या ठेक्या वर सादर केले . सप्ताहाच्या
पहिल्या रात्री भाविकांसाठी तसेच भजन कला मंडळातील सदस्यांना जेवणाची उत्कृष्ट सोय केली होती त्याचा लाभ सर्वानी घेतला. मध्यरात्री 12वाजता दिंडी काढली जाते त्यामध्ये सामील होणे हे एक पुण्य समजले जाते आणि पाहणे सुद्धा महत्वाचे ठरते.
सकाळी 6वाजता काकड आरती झाली. त्यानंतर 10वाजेपर्यंत गावातील लोकांनी ठेका धरला.10वाजता भटजीनी परत उत्तर पूजा करून सप्ताह समाप्ती केली. त्यानंतर देवालया भोवती पाच प्रदक्षिणा घालून महाआरती केली आणि महाप्रसाद दिला गेला त्यात खीर ही महत्वाचे आकर्षण असते.ग्रामस्थ आणि आलेल्या सर्व भाविकानी
महाप्रसादाचा लाभ घेतला.
दुसऱ्या दिवशी दुपारी महाप्रसाद होऊन हरीनाम सप्ताहाची सांगता झाली.
हा सप्ताहची रंगत अतिशय रंजक होती. तो यशस्वी बनविण्यात स्थनिक ग्रामस्थांनी अपार मेहनत घेतली त्यास मुंबई स्थित ग्रामस्थांची योग्य साथ मिळाली. सर्व ग्रामस्थांचा स ह भाग वाखाणण्याजोगा होता.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!