माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या प्रवेशावर पहिल्यांदाच राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांची प्रतिक्रिया..
🖥️ Kokan Live Breaking News
🎴बारामती,दि.१९: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा प्रवेश हा आता खडसेंचा प्रश्न असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर दिली आहे.
बोलतांना शरद पवार म्हणाले की, भारतीय जनता पक्ष वाढविण्यात भाजपचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे योगदान आहे. परंतु भाजपकडून आपली नोंद घेतली जात नाही, असं एकनाथ खडसे यांना वाटतं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीत एकनाथ खडसेंचा प्रवेश त्यांचा प्रश्न आहे. एकनाथ खडसेंच्या प्रवेशावर पहिल्यांदाच शरद पवारांनी प्रतिक्रिया दिल्या.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचे राज्यभर वारे सुरु आहे. कधी घटस्थापनेचा मुहूर्त, तर कधी विजयादशमीचा. सीमाउल्लंघन असे मुहूर्त समोर येत आहेत. मात्र, याबाबत खडसेंनी कधीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे नुसत्या चर्चा होतांना दिसत आहेत. काल तर चक्क खडसेंनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या आल्या अखेर भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा दिलाच नाही. असे स्पष्ट केले. तर त्यानंतर खुद्द एकनाथ खडसेंनी देखील राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
तूर्तास खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना विराम
एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा प्रश्न आता खडसेंच्या असल्याचे शरद पवार यांनी सांगितलं आहे.तर भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व खुद्द खडसेंनी सांगितल्यामुळे तूर्तास तरी एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना विराम. असंच म्हणावं लागेल.
_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_
*🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_
*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*
🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.
*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

