केसरकर यांना नगराध्यक्ष पद देखील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुळेच मिळाले होते…नगराध्यक्ष संजू परब
🟣 केसरकर यांना नगराध्यक्ष पद देखील केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुळेच मिळाले होते… संजू परब
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*✍️ ब्यूरो न्यूज :- कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
🎴सावंतवाडी- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या आमदारापेक्षा आमचा सरपंच चांगले काम करतो, अशी टीका केली होती. परंतु, आमदार केसरकर हे त्यांनी सरपंच्यांचा अपमान केला असे सांगत दिशाभूल करत आहेत. केसरकर यांना नगराध्यक्ष पद देखील केवळ केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यामुळेच मिळाले होते. तर दादांनी आपल्या कार्यकर्त्यांना त्यावेळी सांगितले होते, दिपक केसरकर यांचा पराभव म्हणजे आपला पराभव त्यामुळेच दिपक केसरकर हे आमदार होऊ शकले. परंतु, त्यानी गद्दारी करत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी देखील राजन तेली यांचा केवळ १२ हजार मतांनी पराभव झाला असून, त्यांच्याकडे पक्षाचे चिन्ह असते तर राजन तेली यांचा विजय निश्चित झाला असता. असे मत त्यानी व्यक्त केले.
उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या स्टॉल मध्ये नगरपालिकेचा हात नसून, बांधकाम विभागाचा हात असल्याचे खुद्द काल आमदार केसरकर यांनीच कबूल केले . यावेळी ते पुढे म्हणाले की, जो पर्यंत दिपक केसरकर आमदार आहेत. तोपर्यंत तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाचा विकास होऊ शकत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. केसरकर यांनी संस्कृतीपेक्षा आता रोजगारावर बोलवे, किती युवकांना रोजगार दिला ते सांगावे असे आवाहन केले. तर येत्या काही काळात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून तालुक्यातील ५०० युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे मत त्यांनी स्पष्ट केले आहे.
________________________
*🤩सुवर्णसंधी…😍 सुवर्णसंधी… 🤩सुवर्णसंधी..*
*👨🏼💼MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास सुवर्णसंधी*
MPSC 2022 क्लासेस स्काँलरशिप परीक्षा
*👨🏻🎓👨💻१५० गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस*
_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना MPSC परिक्षेसाठी आम्ही केलं होतं वचनबद्ध.. मात्र कोरोनामुळे या सर्वाला लागला होता ब्रेक,आता वेळ आली आहे दिलेले वचन पूर्ण करण्याची.._
*📲परीक्षा फाँर्म आँनलाईन भरण्यासाठी वेबसाईट लिंक*
https://edmission.online/mpsc2022
*🔸महत्त्वाची सुचना:-* फक्त आँनलाईन पद्धतीने केलेलेच अर्ज परिक्षेसाठी स्विकारले जातील…आँनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ डिसेंबर २०२१
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

