कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

वर्षानुवर्षे एकाच कार्यासनावर ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळेच जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कारभारातील भष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये वाढ

*🟣वर्षानुवर्षे एकाच कार्यासनावर ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळेच जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कारभारातील भष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये वाढ.*

*🟣प्रशासकीय बदली झालेली असताना देखील अधिकारी जिल्हात ठाण मांडून बसतात ते नेमक्या कोणाच्या वरदहस्ताने*

*🟣जिल्ह्यात तपासणीसाठी येणाऱ्या पंचायत राज समितीचे याबाबत लक्ष वेधणार..मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*✍️ प्रतिनिधी :-सुनील आचरेकर*

*🎴 कुडाळ,दि,:-२२ नोव्हेंबर*
जिल्हा परिषदकडील प्रशासकीय कारभाराचा मागील तीन वर्षांचा आढावा घेतला असता प्रशासकीय कारभारात अनियमितता व भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. यामध्ये वर्षानुवर्ष एकाच कार्यसनावर ठाण मांडून बसलेले कर्मचारी कारणीभूत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते.मुळात पाच वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच विभागात व तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच कार्यसनावर काम करणे नियमानुसार प्रतिबंधित असताना प्रत्यक्षात मात्र काही कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच कार्यासनावर ठाण मांडुन “हम करे सो कायदा” या पद्धतीने प्रशासकीय कारभार हाकत आहेत.कायदेशीर तरतुदींना बगल देऊन प्रचलित कार्यपध्दती अशा कर्मचाऱ्यांना “नियम” वाटू लागली आहे असे चित्र आहे. शिवाय विभागीय आयुक्तांचे आदेश असताना देखील प्रतिनियुक्त्या रद्द केलेल्या नाहीत. कालांतराने एकाच पदावर व कार्यासनावर राहून त्यातील कायदेशीर पळवाटा माहीत झाल्याने कर्मचाऱ्यांकडून कळत-नकळतपणे अनियमितता घडून येतात व परिणामी पारदर्शी प्रशासनावर थेट परिणाम होतो. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडील लाड पागे नियुक्त्या भ्रष्टाचार,अनुकंपा नियुक्ति भ्रष्ट कारभार, वॉटर प्युरिफायर-टेलिव्हिजन यासारखे शिक्षण विभागाकडील खरेदी प्रक्रियेतील गैर प्रकार,भ्रष्टाचार आरोप असलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नत्या बक्षिसी देणे यासारख्या घटना यामधूनच घडून येतात. प्रशासकीय बदली होऊन वर्षभराचा कालावधी उलटून देखील “वित्तीय” वरिष्ठ अधिकारी जिल्हात ठाण मांडून नेमक्या कोणाच्या वरदहस्ताने आहे हे समोर येणे आवश्यक आहे. यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत तपासणीसाठी येणाऱ्या पंचायत राज समितीला मनसेच्या माध्यमातून पत्रव्यवहार करून लक्षवेधण्यात येणार असून प्रसंग अध्यक्षांची भेट घेऊन अशा भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांना बाबत कारवाईची मागणी करणार असल्याची माहिती मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
*👇👇सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________

*🤩सुवर्णसंधी…😍 सुवर्णसंधी… 🤩सुवर्णसंधी..*

*👨🏼‍💼MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास सुवर्णसंधी*

MPSC 2022 क्लासेस स्काँलरशिप परीक्षा

*👨🏻‍🎓👨‍💻१५० गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस*

_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना MPSC परिक्षेसाठी आम्ही केलं होतं वचनबद्ध.. मात्र कोरोनामुळे या सर्वाला लागला होता ब्रेक,आता वेळ आली आहे दिलेले वचन पूर्ण करण्याची.._

*📲परीक्षा फाँर्म आँनलाईन भरण्यासाठी वेबसाईट लिंक*
https://edmission.online/mpsc2022

*🔸महत्त्वाची सुचना:-* फक्त आँनलाईन पद्धतीने केलेलेच अर्ज परिक्षेसाठी स्विकारले जातील…आँनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ डिसेंबर २०२१

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!