कुडाळकोकणक्राइमसिंधुदुर्ग

गोवा बनावटीच्या 48 लाखाच्या अवैध दारूसह 64 लाखाचा मुद्देमाल जप्त

*🛑गोवा बनावटीच्या 48 लाखाच्या अवैध दारूसह 64 लाखाचा मुद्देमाल जप्त*

*🛑ओसरगाव येथे उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई*

*🛑तीन आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी:-सुनील आचरेकर*

*🎴 सिंधुदुर्ग,दि,:-२१नोव्हेंबर*
मुंबई-गोवा महामार्गावर टेम्पोतून लपवून नेत असलेले गोवा बनावटीची 48 लाखाची दारू उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी पहाटे जप्त केली. टेम्पोत ठेवलेल्या मैद्याच्या पिठाच्या पोत्याच्या आड दारूचे बॉक्स लपवून ठेवण्यात आले होते. याची गुप्त माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली होती. त्या नुसार सापळा रचून 20 नोव्हेंबर रोजी सकाळी ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी रवि चंद्रकांत जाधव (वय २८ वर्षे रा . विनोबा भावे खारबाय रोड भिवंडी जि . ठाणे) नरेंद्र रामसेवक गुप्ता (वय ३२ वर्षे रा . खारबाव रोड अंजुर फाटा, भिवंडी जैन मंदिराच्या समोर जि ठाणे), सिध्दार्थ मधुकर घोडके (वय ३५ वर्ष रा. हनुमान नगर दहिसर चेकनाका केतकीपाडा दहिसर ईस्ट मुंबई) यांच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ए), ( ई ) ८०, ८१, ८३, व ९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीना न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक कणकवली यांनी ही कारवाई केली. तसेच टाटा कंपनीचा चॉकलेटी रंगाचे मालवाहू टेम्पो क्रमांक एम . एच . ०४ जे . के . ७ ९ ०१ व क्रमांक एम . एच . ०४ जे . के . ९ ५७३ मध्ये विविध ब्रॅन्डच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारू चे ७५० मिली मापाचे १३० बॉक्स (१५६० बाटल्या ), १८० मि.ली मापाचे २६५ बॉक्स (१२७२० बाटल्या ) व ५०० मि ली मापाचे १६० बॉक्स (३८४० टीन ) अशी ४८ लाख २३ हजार ८ ९ ४ व दारु जप्त करण्यात आली. तर वाहनांची किंमत १६ लाख मिळून एकूण रु ६४ लाख,२३हजार ,८ ९ ४ किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. अधीक्षक डॉ. बी . एच . तडवी यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक पी . जी . सावंत, यांनी ही कारवाई केली. सदर कारवाईमध्ये दळवी , पुजारी निरीक्षक , जी . सी . जाधव, दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, सहाययक दुययम निरीक्षक सुरज चौधरी, स्नेहल कुवेसकर, रणजीत शिंदे , शिवशंकर मुपडे , जंगम, यांनी सहभाग घेतला. मदतनीस म्हणून साजिद शहा व श्री खान यांनी काम केले . गुन्हयाचे पुढील तपासकाम पी . जी . सावंत निरीक्षक कणकवली करत आहेत.

*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
*🪔🪔सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🪔🪔*
• नवीन सायकल खरेदी करूया आरोग्यदायी फायदे मिळवूया !

*सायकल क्षेत्रातील विश्वसनीय नाव✨*
(सन १९५३ पासून )

*_🚲मे. पेडणेकर सायकल कंपनी🚴‍♂️_*
मेन रोड सालईवाडा सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग
*_🏮सर्व वयोगटासाठी सर्व प्रकारच्या सायकल्स योग्य दरात उपलब्ध !_*
*_🏮जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँडस मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण_*
◆ Hero ◆Montra ◆Huge ◆Montra
◆Ahoy ची भरघोस रेंज उपलब्ध
🎉100+ सायकल उपलब्ध
🎉ग्राहकांनी लाभ घ्या
*💰बजाज फायनान्सची सुविधा संपूर्ण जिल्ह्यात असणारे एकमेव ठिकाण*
• आजच आपली नवीन सायकल खरेदी करा

*🚴‍♂️ऑफर स्टॉक असेपर्यंत

*• होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध (T&C Apply)*

*📲संपर्क – शरद चंद्रशेखर पेडणेकर*

*8108285128 | 9421269525 | 7083235822*

#PednekarCyclesSawantwadi #BajajFinance#EasyEmis
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*û

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!