कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

रक्तदाते हे योद्धे आहेत” सातार्डा येथील संजय पिळणकर मित्रमंडळ व माजी विद्यार्थी आयोजित रक्तदान शिबिरात तहसीलदार म्हात्रे यांचे प्रतिपादन.

_*🛑 “रक्तदाते हे योद्धे आहेत” सातार्डा येथील संजय पिळणकर मित्रमंडळ व माजी विद्यार्थी आयोजित रक्तदान शिबिरात तहसीलदार म्हात्रे यांचे प्रतिपादन..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे*

*🎴सावंतवाडी, दि-१६ :-* सातार्डा म.गां.वि.मं. हायस्कुल सातार्डा या प्रशालेच्या “हिरकमहोत्सवी’ वर्षानिमित्त संजय पिळणकर व मित्रमंडळ यांच्या संकल्पनेतून व माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून तसेच डी.एन.मांजरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिर रविवार दि.१४ नोव्हेंबर २०२१ रोजी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.यावेळी ८० रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला.
यावेळी रक्तदान शिबिराचे उदघाटन सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी बोलतांना म्हात्रे यांनी संजय पिळणकर व मित्रमंडळ व या कार्यात सहभागी माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.तसेच रक्तदाते हे *योद्धे* आहेत,असे प्रतिपादन केले.
यावेळी सातार्डे मध्यवर्ती संघ मुंबई या संस्थेचे कार्यवाह जॉकी फर्नांडिस यांनी संस्थेच्या *अमृतमहोत्सवी* व शाळेच्या *हिरकमहोत्सवी* वर्षानिमित्त शाळेचे माजी विद्यार्थी म्हणून संजय पिळणकर व मित्रमंडळ, तसेच त्यांना सहकार्य करणारे माजी विद्यार्थी व माजी मुख्याध्यापक डी.एन.मांजरेकर यांचे अभिनंदन केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी रक्तदानाविषयी विस्तृत अशी बहुमोल माहिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली.
यावेळी तब्बल ७६ वेळा रक्तदान करणारे सावंतवाडी शहरातील सन्मा.सुधीर पराडकर,तसेच सावंतवाडी शहरात सुमारे ३६ वर्षांपूर्वी रक्तदानाची चळवळ सुरू करणारे सन्मा.आनंद वेंगुर्लेकर,सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मा.प्रकाश तेंडोलकर,सचिव बाबली गवंडे,तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचे उपस्थितांच्या हस्ते शाल,पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर पं.समिती सदस्य सौ.श्रुतिका बागकर,सातार्डा सरपंच संजना मेस्त्री,कवठणी सरपंच सुमन कवठणकर,किनळे सरपंच दीपक नाईक,संस्थेचे अध्यक्ष महेंद्र मांजरेकर,शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत सावंत,संस्थेचे कार्यवाह जॉकी फर्नांडिस,संस्थेचे सदस्य अनिल तळवणेकर,प्रशांत पुनाळेकर, डी.एन.मांजरेकर सर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला सावंतवाडी रक्तपेढी व एसएसपीएम पडवे,तालुका वैद्यकीय अधिकारी उत्तम पाटील, मळेवाड वैद्यकीय अधिकारी अदिती ठाकूर,आरोग्य सेविका परब,जंगम यांचे सहकार्य लाभले.तसेच सुधा उर्फ सुदन कवठणकर,रुपेश साळगावकर, राजन हळदणकर,उमेश मांजरेकर,पपी कवठणकर,सुदन केरकर,उमेश कांबळी,यामेश्वर कवठणकर,मडूरा उपसरपंच विजय वालावलकर,शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पिळणकर यांनी केले.सूत्रसंचालन पपी कवठणकर व संतोष कांबळी यांनी केले तर आभार संतोष कांबळी व डी. एन.मांजरेकर यांनी मानले.

*…………….👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🩺आरोग्यम धनसंपदा👨🏻‍⚕️*

सस्नेह नमस्कार.🙏

_🎊विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर २०२१ पासून आम्ही आपल्या आरोग्यसेवत रुजू होत आहे.🎊_

क्लिनिकच्या शुभारंभानिमित्त

*दि. १६ आणि १७ ऑक्टोबर २०२१ या दोन दिवशी*

जनरल चेकअप कॅम्प आयोजित केला असून या कॅम्प मध्ये जनरल चेकअप (बीपी/शुगर) आणि औषधे केवळ रु. १००/- या माफक किंमतीत दिली जातील. तरी या कॅम्पचा लाभ घ्यावा.

👨🏻‍⚕️ *आरोग्य*
*क्लिनिक*🩺
जनरल प्रॅक्टीशनर आणि होमिओपॅथिक कन्सल्टंट

💉Reg. No. 68484

🥼आरोग्य हीच खरी आपली संपत्ती असून आपल्या आरोग्याची आपणच काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोणताही आजार बळावण्यापूर्वीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

*📍जे. आर. डी. हॉटेलसमोर, आंबोली. सोमवार ते बुधवार वेळ स. १०.०० ते संध्या. ६.००*

*👨🏻‍⚕️डॉ. शितेज्य शिवाजी डोंगरे*
Pursing MD (Hom.), B.H.M.S.

*👉विशेष उपचार आणि योग्य मार्गदर्शन👈*
संधीवात | मूळव्याध | मुतखडा पोटाचे आजार। रक्तदाब | मधूमेह थाईरॉईड | श्वासाचे विकार त्वचारोग । हाडांचे विकार लहान मुलांचे आजार | स्त्रीयांच्या आरोग्यविषयक समस्या कोरोना उपचार

*🕸️Website: drdongre.com*
*🤳Contact : 9405311703, 7798405143*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!