कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

फणसवडे येथील महिला बचत गटाचे साडेपाच लाखांचे कर्ज फेडले

*🛑फणसवडे येथील महिला बचत गटाचे साडेपाच लाखांचे कर्ज फेडले*.

*🛑. डॉ चंद्रकांत सावंत यांनी फणसवडे येथील महिला बचत गटांना भाऊबीजेची अनोखी भेट देत केले कर्जमुक्त*

*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*✍️ प्रतिनिधी:-प्रभाकर गावडे*

*🎴 फणसवडे,दि,:-९नोव्हेंबर*
शैक्षणिक सामाजिक समाजसहकार्यासाठी नैसर्गिक भौगोलिक परिस्थितीचा विचार करून डाॅ. चन्द्रकांत तुकाराम सावंत सर यांच्या पूर्ण व्यवस्थापनाखाली व जबाबदारीवर श्री देव मल्नाथ वनश्री , तेजश्री , यशश्री , राजश्री , भाग्यश्री , धनश्री , वेदश्री, कलाश्री , दीपश्री महिला बचत गट व वीरश्री बाल बचतगट फणसवडे ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग कार्यरत आहेत.
महिला बचत गटाद्वारे आपल्या घरगुती आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी तसेच गरजा पूर्ततेसाठी महिला सदस्यांनी कर्जरक्कम घेतलेली होती . व त्याचा घरगुती विकासकार्यात वापर केलेला होता. दरमहा २५ रुपये मासिक शुल्क जमा करत जवळपास डाॅ. चन्द्रकांत सावंत गुरूजींच्या व्यवस्थापनाखाली कर्ज रूपात २५ लाखापर्यंत रक्कम उपयोगात आणली. यातूनच शाळा , गाव विकासकार्यातही मोलाची भर पडली. काही आर्थिक नैसर्गिक कारणामुळे तसेच कोविड १९ परिणामामुळे काही सदस्यांना कर्जरक्कम व व्याजरक्कम न भरता आल्यामुळेच त्यांच्या नावे आज रोजी कर्जरक्कम शिल्लक राहीली.
माता पालक सदस्यांनी आजपर्यंत जवळपास २५ व्या वर्षाच्या कालावधीतही केलेल्या शैक्षणिक सामाजिक सहकार्य व दाखविलेल्या आपुलकी व विश्वासामुळे त्यांच्या नावे असलेली आजपर्यंतची शिल्लक कर्जरक्कम ५,३५,५२५/- ( पाच लाख पस्तीस हजार पाचशे पंचवीस रुपये मात्र ) डाॅ . चन्द्रकांत सावंत सर आंबोली गावठणवाडी ( माजी मुख्याध्यापक, जि. प. सिंधुदुर्ग आदर्श प्राथमिक शाळा , फणसवडे ता. सावंतवाडी तथा व्यवस्थापकीय संचालक श्री देव मल्नाथ महिला बचत गट फणसवडे ( सर्व बचत गट ) ता. सावंतवाडी या नात्याने स्वतः संपूर्ण जबाबदारी स्वीकारून आपुलकीची मायेची माणसं या नात्याने या बचत गटाकडून त्याच्या हस्ते घेतलेल्या शिल्लक कर्जरक्कमेतून दीपावली लक्ष्मीपूजन शुभदिनी महिला सदस्यांना १००% डाॅ. सावंत सरांकडून कर्जमुक्त करण्यात आले .
शाळा , गाव ते राज्यस्तरीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरीय विविध सन्मान प्राप्त तसेच कायमस्वरूपी रक्कम जमा करत ७१शाळांमधील ११२ विद्यार्थीनी दत्तक घेतलेले . चन्द्रकांत सावंत सर यांच्याकडून शिल्लक कर्जरक्कम नावे असलेल्या महिला सदस्यांना 100% कर्जमुक्तीचे आपुलकीचे अविश्वसनीय पत्र तसेच महिला सदस्यांना दिपावली भेट देण्यात आली यावेळी सौ. विजया विजय गावडे बचतगट अध्यक्षा , सौ. रत्नप्रभा चंद्रकांत गावडे उपाध्यक्षा , सौ. रोहिणी संजय गावडे सचिव , सौ. लक्ष्मी गंगाराम गावडे , सौ. शोभा उत्तम नाईक , सौ. वनिता गोविंद नाईक , श्रीम. गीता काशिनाथ गावडे , सौ. सिताबाई विठ्ठल गावडे , सौ. सावित्री सत्यवान गावडे , सौ. सुनिता सत्यवान गावडे , सौ. स्वाती शेखर गावडे , सौ. दीपश्री लक्ष्मण गावडे , सौ. सुप्रिया सुभाष गावडे , सौ. सुमित्रा एकनाथ गावडे , सौ. लक्ष्मी गंगाराम गावडे , सौ. शुभांगी सूर्यकांत गावडे , सोनल विजय गावडे , सानिया विजय गावडे या सदस्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

________________________
_*😍सुवर्णसंधी..😍सुवर्णसंधी.. सुवर्णसंधी..😍*_

*🎊दिवाळी धमाका आँफर🎊*

*🎉दिसतं तस नसतं…म्हणूनच जग फसतं!🎉*
*🔸आता आँनलाईन पेक्षा ही स्वस्त दरात🔸*

_🏃‍♂️धावून आलेली सुवर्णसंधी सोडू नका आजच सावंतवाडीतील म्युझिक काँर्नर शाँपीला भेट द्या🏃‍♂️_

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

*📲कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू🎁…*

*💵बजाज फायनान्सवर घेणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक भेटवस्तू व लकी ड्राँ.मधून मोबाईल जिंकण्याची सुवर्णसंधी*

*📲मोबाईल अँक्सेसरीज वर मिळवा ६०% पेक्षा जास्त सूट*

*🖥️सर्व ब्रँडचे LED TV आँफर किंमतीत उपलब्ध*

*आमचा पत्ता:*
*म्युझिक काँर्नर*
_इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड मोबाईल शाँपी_
विठ्ठल मंदिर रोड,जयप्रकाश चौक सावंतवाडी
8799978651 / 7719918722

*नियम व अटी लागू*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!