कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीय

🛑 बाबासाहेबांच्या घटनेतून साकारलेला देश वाचवण्यासाठी काँग्रेस हाच पर्याय..

 

_*🛑 प्रशांत यादव : प्रभाग क्रमांक 10 मध्ये सदस्य नोंदणीला प्रारंभ..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*

_अचुक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*

*🎴चिपळूण, दि-०३ :-* महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी, त्यांनी लिहिलेल्या घटनेतून साकारलेला देश वाचविण्यासाठी काँग्रेस हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे काँग्रेसचा हात बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहन काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री. प्रशांत यादव यांनी केले. शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये वरची बावशेवाडी येथील बौद्धविहारमध्ये आयोजित कार्यकर्ता बैठकीत श्री. यादव बोलत होते. यावेळी प्रभागात काँग्रेसच्या सदस्य नोंदणी मोहिमेचाही शानदार प्रारंभ करण्यात आला. या बैठकीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.

यावेळी श्री. यादव पुढे म्हणाले, की आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बैठका घेत नाही. निवडणुका येतील आणि जातीलही मात्र काँग्रेस हा त्यागाचा पक्ष आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेल्या हक्कांवर गदा येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याविरोधात काँग्रेस देशभर लढा देत आहे. लोक काँग्रेसला मानतात. फक्त आपल्याला काँग्रेसचा विचार घराघरात पोहचवायचा आहे. आपल्याला संघर्ष करावा लागला, तरी चालेल मात्र बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली घटना आपल्या भावी पिढीसाठी अबाधित ठेवण्याचे काम आपल्याला करावे लागेल.

सदस्य नोंदणी मोहीम म्हणजे केवळ पक्षातील सदस्यांची संख्या वाढविण्यासाठी नाहिये. या मोहिमेच्या माध्यमातून सर्वांना एकत्र आणून देशात अराजकता माजविणाऱ्या शक्तींविरोधात लढा देणे, हे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटीतपणे काम करणे गरजेचे आहे. शहराच्या विकासासाठी काँग्रेसचे नगरसेवक प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांच्या पाठीशी आपल्याला भक्कम फळी उभी करायची आहे, असेही यावेळी श्री. यादव म्हणाले.

यावेळी अभिजित कांबळे यांच्या हस्ते प्रभागातील सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा प्रभागातील नागरिकांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, नगरसेवक कबीर काद्री, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुरेश कातकर, माजी उपनगराध्यक्ष व काँग्रसचे शहराध्यक्ष लियाकत शाह, प्रवक्ते वासुदेव सुतार, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अन्वर जबले, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य गुलजार कुरवले, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष श्रद्धा कदम, सेवादलच्या युवती जिल्हाध्यक्ष भक्ती कुडाळकर, शहराध्यक्ष स्नेहा आमले, सेवादलचे तालुकाध्यक्ष इम्तियाज कडू, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष फैसल पिलपिले, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले, मुन्ना दळी, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राकेश दाते आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह स्थानिक नागरिक उपस्थित होते. बावशेवाडीचे अध्यक्ष राजू जाधव यांनी सूत्रसंचालन केले.

 

……………..

*चौकट*

 

*बौद्धविहारसाठी 25 हजारांची देणगी*

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी बौद्धविहाराच्या रखडलेल्या कामाला गती मिळावी, यासाठी वैयक्तिक पातळीवर 25 हजार रुपयांची देणगी जाहीर केली. बौद्धविहारसारख्या समाजमंदिरांच्या माध्यमातून एक चांगला समाज घडत असतो. याच भावनेतून ही देणगी देत असल्याचे श्री. यादव यांनी सांगून पक्षाच्या आणि विविध संस्थांच्या माध्यमातून बौद्धविहारसाठी भविष्यातही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. श्री. यादव यांच्या या उदार भावनेला उपस्थितांनी टाळ्यांचा गजरात दाद दिली.

 

*…………..👇👇सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

 

 

 

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

_*🪔 दिवाळी उत्सव ऑफर 🪔*_

_🔺 *आस्था कॉम्प्युटर शॉपी™*_

 

*💻आता लॅपटॉप खरेदी करा बजाज फायनान्स तर्फे 0% व्याजदर आणि सुलभ हप्त्यावर*

 

🔷 *Dell 🔷Lenovo 🔷hp 🔷Asus 🔷Acer🔷*

 

💥 *वरील सर्व नामवंत ब्रॅण्डचे लॅपटॉप हजर स्टॉकमध्ये असणारे सिंधुदुर्गातील एकमेव*

🔥 *Authorised Multibrand outlet*🔥

 

🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊

🎁🎁 *प्रत्येक लॅपटॉप खरेदीवर 1250 /- ते 5500 /- किमतीचे ब्लूटूथ हेडफोन्स किंवा पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर्स हमखास गिफ्ट* 🎁🎁

📣 FREE 📣 FREE 📣 FREE📣

————————————————–

*💁🏻‍♂️ग्राहकांचे पुर्वीचे बजाज EMI 💳 कार्ड 📲 असल्यास 0️⃣प्रोसेसिंग फी*

(ऑफर कालावधी 15 नोव्हेंबर पर्यंत )

🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

*नवीन बजाज EMI 💳 कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे व अटी*

 

👉 *आधार कार्ड / पॅन कार्ड /बँक पासबुक* 👈

_▪️ग्राहकाचे वय २५ वर्ष पुर्ण असावं_

_▪️मुळ किंमतीच्या 33 % डाऊन पेमेंट रक्कम खरेदी वेळी आवश्यक_

_▪️उरलेल्या रक्कमेचे 0 % व्याजानं 6 ते 10 महिन्यांचे समान हाप्ते_

 

_💁🏻‍♂️एकदा अवश्य भेट द्या…!_

 

🔺 *आस्था कॉम्प्युटर शॉपी*

_एस. टी. स्टँड जवळ, गोमंतक हॉटेलच्या मागे, अजिंक्य लॉज ,पहिला मजला सावंतवाडी_

 

*📱 संपर्क*

विनायक 9405099961

अनिकेत 7410594392

विशाल 9766096488

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!