🛑 अनिल शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली जिल्हा परिषद अध्यक्षांची भेट..
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचुक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग , दि-०३ :-* जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांची दिव्यांग बांधवांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांवर चर्चा केली यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ संजना सावंत यांनी दिव्यांग बांधवांचे प्रश्न समजून घेत ते सोडविण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला .दिव्यांग बांधवांसाठी समाजकल्याण कार्यालयांमध्ये स्वतंत्र कक्ष स्थापन करावा असे आदेशही त्यावेळी यांनी दिली. यावेळी रिक्त पदे व विविध योजना संदर्भात चर्चा करण्यात आली. दिव्यांग आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे सहसंयोजक श्यामसुंदर लोट, जनसंपर्क प्रभारी सदानंद पावले, विनायक देसाई, शेखर आळवे आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते.

