कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 परमे येथील खडी क्रेशर बंद करण्या बाबत ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन..

 

🛑 क्रशरांचे उत्खनन आणि वाहतुक अशीच सुरु राहिल्यास ग्रामस्थांच्या रोषाला व प्रक्षोपाला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

अचुक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२९ :- परमे गावात मोठ्याप्रमाणावर खडी क्रशर चालू आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे. या प्रसंगातून त्यांची सुटका व्हावी यासाठी परमे येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांना खडी क्रशर बंद करण्याबाबत निवेदन दिले आहे.

०२ मार्च २०२० रोजी सदर प्रश्नी परमे ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी ,तहसीदार दोडामार्ग पोलिस निरीक्षक यांना निवेदन देऊन सुद्धा सदर खडी क्रशर वर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलली नाही. तसेच यासंबंधी दखल सुद्धा घेतलेली नाही. सदर क्रशर मुळे २०१९ पासुन अनेक ठिकाणी भुस्खलन होवून जनजीवन विस्कळीत झाले आहे. परमे वासियांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. गावात होणारे भुस्खलन असेच चालू राहील तर परमे गावाचा माळीण गाव होण्यास वेळ लागणार नाही. सदर खडी क्रशरची वाहतुक परमे गावातुन चालू राहिली तर अरुंद रस्त्यांमुळे अनेक अपघात घडण्याची शक्यता आहे आणि याला जबाबदार कोण असा सवाल परमे ग्रामस्थांनी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात उपस्थित केला आहे.

खडी क्रशर बंद करण्याबाबत योग्य ती दखल प्रशासनाने घ्यावी अशी विनंती परमे ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या क्रशरांचे उत्खनन आणि वाहतुक अशीच सुरु राहिल्यास ग्रामस्थांच्या रोषाला व प्रक्षोपाला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे ग्रामस्थांनी निवेदना द्वारे तहसिलदार दोडामार्ग यांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!