मनोरंजनमुंबईसामाजिकसावंतवाडी

इन्सुली गावचे सुपुत्र मराठी सिने-नाट्य अभिनेते दिगंबर नाईक यांचा भारतीय टपाल खात्याकडून सन्मान..

▪️भारतीय पोस्टाचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणूनही अभिनेते दिगंबर नाईक यांची निवड..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴सावंतवाडी,दि.१७: जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावचे सुपुत्र मराठी सिने-नाट्य अभिनेते दिगंबर नाईक यांचा भारतीय टपाल खात्याने मोठा सन्मान केला आहे. सिने-नाट्य, कला व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल दिगंबर नाईक यांचे छायाचित्र असलेले टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले आहे. तसेच भारतीय पोस्टाचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणूनही यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही नावलौकिक वाढला आहे. या निमित्ताने अतिशय सामान्य कुटुंबातील होतकरू मुलाचे, कोकणच्या मातीतील कलाकाराचे, आपल्या अभिनयाने कलाक्षेत्रात, चित्रपट-नाट्यक्षेत्रात एक वेगळाच मानदंड प्रस्थापित करणाऱ्या तसेच राजकीय क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने सगळ्यांची मन जिंकणाऱ्या गुणी अभिनेत्याचा गौरवच झाला आहे.

अलीकडेच सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना भारतीय डाक सेवेच्या तिकिटावर स्थान मिळाले होते. या सन्माना बरोबरच भारतीय डाक खात्याने दिगंबर नाईक यांच्या रूपाने एका मालवणी माणसाला  तिकिटावर स्थान देऊन सावंतवाडी च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

स्व. मच्छिंद्र कांबळी यांच्यानंतर मालवणी बोली भाषा सातासमुद्रापार नेणारे दिगंबर नाईक यांना मालवणी मातीतील कलाकार म्हणून भारतीय डाक विभागाच्या तिकिटावर स्थान देण्यात आले आहे. यानिमित्ताने प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका मालवणी कलाकाराचा भारतीय डाक विभागाने सन्मान केला आहे. विशेष म्हणजे दिगंबर नाईक यांचा फोटो असलेली पाचशे रुपयांची तिकिटे प्रथमच विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत.

गुरुवारी सायंकाळी दादर येथे झालेल्या कार्यक्रमात या तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पोस्टाचे वरिष्ठ अधिकारी बी.एस. पठारे, एस.एल. परब बाळा चौकेकर, सुरेंद्र पालव आदी यावेळी उपस्थित होते.

*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता  कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!