कोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🛑 दोडामार्ग – सोनावल एसटी बस सेवा लवकरात लवकर सुरू करावी..

 

🛑 मनसे दोडामार्ग उपतालुका अध्यक्ष संदीप गवस यांची आगार प्रमुखांकडे निवेदनाद्वारे मागणी..

🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचुक बातमी थेट हल्ला

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२७ :- दोडामार्ग आगारा मधून दोडामार्ग- सोनावल ही बस सेवा दुपारी 12 वा सुरू होती.पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही काळ ही सेवा बंद होती. शाळा,कॉलेज , महाविद्यालय , आयटीआय सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची तथा प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
त्यामुळे एसटी महामंडळाने याची दखल घेत सरकारच्या कोरोना विषयक नियमांचे पालन करून दोडामार्ग सोनावाल एसटी बस सेवा सुरू करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोडामार्ग उपतालुका अध्यक्ष संदीप गवस यांनी निवेदनाद्वारे दोडामार्ग आगार प्रमुख यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!