🛑 शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांच्या इशाऱ्या नंतर पोलिसांच्या गेट खाजगी बसेस साठी खुल्या..
🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
अचुक बातमी थेट हल्ला
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-२१ :- कोविडच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या गोवा राज्यात ये- जा करणाऱ्या खाजगी बसेसना दोडामार्ग हद्दीत प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे खाजगी बस मधुन ये- जा करणार्या प्रवाशांचे हाल होत होत. प्रवाशांचे हाल लक्षात घेवून शिवसेना तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांनी आक्रमक भुमिका घेत आजची डेडलाईन दिली होती.
अखेर याची दखल घेत प्रशासनाने खाजगी बसेसना दोडामार्गात प्रवेश दिला. दोडामार्ग पालीस निरीक्षक आर. जी. नदाफ यांनी श्रीफळ वाढवून या बसेसना दोडामार्ग हद्दीत प्रवेश दिला.
शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आज सकाळी ११ पर्यंतची डेडलाईन प्रशासनाला दिली होती.अन्यथा स्वतः रस्त्यावर उतरून गेट हटवण्याचा इशाराही त्यांनी दिला होत.याची शासनाने तात्काळ दखल घेत खाजगी बसेसना दोडामार्गात येण्याचा मार्ग मोकळा केला.

