आरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 कोरोना प्रती जनजागृती करणाऱ्या नवदुर्गा डॉक्टर प्रिती पावसकर यांचा सत्कार..

 

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-१४ :-* कसाल गावच्या सुकन्या असलेल्या डॉक्टर मेघा बांदेकर व आता कणकवलीच्या स्नुषा असलेल्या डॉक्टर सौ प्रिती पावसकर या गेली अनेक वर्ष कसाल व कणकवली येथे रुग्णसेवा देत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला व लॉक डाऊन सुरू झाल्यापासून नागरिकांमध्ये कोरोना बाबत विविध समज-गैरसमज होते. तसेच प्रतिबंधात्मक उपाय यांची फारशी माहिती नसल्याने नागरिकांमध्ये कोरोनाबाबत कमालीची भीती होती. लॉकडाऊन मुळे अनेक खाजगी दवाखाने बंद असल्याने कोरोना व अन्य रुग्णांची परवड होत होती यासाठी डॉक्टर सौ प्रिती पावसकर यांनी कसाल व कणकवली येथील दोन्ही क्लिनिक चालू ठेवून दैनंदिन रुग्णांवर औषधोपचार करताना कोरोना आजार व त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यासाठी जनजागृती सुरू केली कोरोनाचे भीतीमुळे अनेक रुग्ण आजार अंगावर काढत असल्याने यांच्या मनातील भीती दूर करणे आवश्यक होते यासाठी यांनी कोरोनाची लक्षणे , विलगीकरणाचे महत्व, मास्क , सॅनिटायझर वापरण्याची आवश्यकता रोगप्रतिबंधात्मक शक्ती वाढविण्यासाठी करावयाचे उपाय स्वॅब टेस्टिंग याबाबत रुग्णांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली काही कोरोना बाधित रुग्णांना ऑनलाईन ट्रीटमेंट द्वावारे मार्गदर्शन केले यामुळे असे कोरोना रुग्ण घरीच कोरोना मुक्त झाले कोरोना प्रति केलेल्या या विशेष योगदानाबद्दल डॉक्टर सौ प्रिती पावसकर यांचा राज्य परिवहन कसाल बस स्थानका तर्फे कसाल बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक महेश तावडे यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उत्तम कदम व अन्य कर्मचारी वर्ग उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!