🛑 कृषी कार्यालयातील महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्या कृषी पर्यवेक्षक अधिकाऱ्यावर योग्य ती कडक कारवाई व्हावी ; मनसेची मागणी..
_*🛑 यापुढे अशा अधिकाऱ्यांना सावंतवाडीत थारा नाही मनसेचे निवेदन..*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-१४ :-* सावंतवाडी येथील कृषी कार्यालयातील महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्या कृषी पर्यवेक्षक अधिकाऱ्यावर योग्य ती कडक कारवाई केली जावी अन्यथा त्या अधिकाऱ्याला तालुक्यात थारा देणार नाही. यापुढे सावंतवाडी तालुक्यात महिलांच्या बाबतीत असे होणारे कोणतेही गैरप्रकार खपवून घेतले जाणार नाहीत त्यांना मनसे स्टाइलने उत्तर दिले जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष आशिष सुभेदार यांनी दिला. दरम्यान यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसूळे यांना मनसेच्या वतीने गुरुवारी निवेदन देण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांची याप्रकरणी चौकशी सुरू असून तो अधिकारी दोषी आढळल्यास त्यावर प्रशासकीय कारवाई केली जाईल असे आश्वासन यावेळी कृषी अधिकारी अडसूळे यांनी दिले. आज मनसेच्या वतीने येथील उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात धडक दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य एस टी कामगार सेना परिवहन जिल्हाध्यक्ष ऍड राजू कासकर, सावंतवाडी शहरअध्यक्ष आशिष सुभेदार संतोष भैरवकर, लक्ष्मीकांत हरमलकर, मंगेश वरक आदी उपस्थित होते. यावेळी सुभेदार यांनी कृषी विभागात कार्यरत असलेले कृषी पर्यर्वेक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून तालुक्यातील कृषी सहाय्यक महिलांच्या बाबतीत असभ्य वर्तन केले जात आहे. यापूर्वी तो अधिकारी कणकवली, कुडाळ कृषी कार्यालयात कार्यरत असताना त्याने असेच प्रताप केले आहेत. त्याचीच पुनरावृत्ती आता सावंतवाडीत झाली असून अशा लंपट अधिकाऱ्यांना यापूढे सावंतवाडी तालुक्यात थारा देणार नाही. त्या अधिकार्यावर कडक कारवाई केली जाईल अन्यथा मनसे स्टाईल धडा शिकवला जाईल असा इशारा दिला. दरम्यान ऍड राजू कासकर यांनी तो वादग्रस्त अधिकारी यापुढे तालुक्यात येता कामा नये याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. त्या अधिकाऱ्याच्या अगोदरच्या घटना पहिल्या असता अशा आदीकरी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे असे सांगितले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी अजित अडसूळे यांनी आपण रजेवरून आल्यानंतर प्रथम या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. त्यानंतर महिलांना बोलावून वस्तुस्थिती जाणून घेतली यावेळी त्यानी संबंधित अधिकाऱ्यांसोबत आम्हाला काम करायचं नाही त्याची बदली केली जावी अशी मागणी केली आहे. तक्रारदार यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले असून या प्रकरणाची प्रशासकीय पातळीवर चौकशी सुरू आहे. तरी प्रशासकीय कार्यवाहीला थोडा विलंब होईल, मात्र तोपर्यंत त्या अधिकाऱ्याला ओरोस जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात बदली तर पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आता महिलांची काही तक्रार राहिलेली नाही परंतु जी काही तक्रार झाली आहे त्या अनुषगाने चौकशी सुरू केली आहे. संबंधित महिलाचे जाब जबाब घेतले आहेत. त्या कृषी पर्यवेक्षकांची कुडाळ येथे ऑर्डर झालेली आहे तरी या प्रकरणाची जोपर्यंत पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांना ओरोस जिल्हा कृषी कार्यालयातच ठेवले जाणार आहे. त्याने ज्या काही घटना व प्रताप अन्य तालुक्यात केले आहेत त्या बद्दल अद्याप रीतसर तक्रारी झाल्या नाहीत मात्र या प्रकरणात निश्चित कारवाई केली केली जाईल. संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास त्यावर निलंबनाची तसेच बदलीची कारवाई केली जाईल असे आश्वासन यावेळी अधिकारी अडसूळे यांनी दिले.

