कोकणक्राइमवैभववाडीसिंधुदुर्ग

गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी झाली पलटी.

_*🛑 गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी झाली पलटी..*_

_*🛑 प्रवाशांना किरकोळ दुखापत ; कासारटाका येथे कारचा अपघात..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-१२ :-* मालवण कुडाळ या मार्गावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टोयोटा इनोव्हा गाडी पलटी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी ३वाजण्याच्या सुमारास कासारटाका नजीकच्या गणपती मंदिराजवळ घडली. या अपघातात गाडीतील काही जणांना किरकोळ दुखापत झाली. आज दुपारी मालवण वरून कुडाळला जाणारी टोयोटा इनोव्हा (क्र. एमएच ०६ ए. एस. ९५८६ ) ही गाडी मालवण वरून कुडाळच्या दिशेने जात होती. या गाडीतून सहाजण प्रवास करत होते. गाडी कासारटाका नजीकच्या गणपती मंदिर जवळ आली असता गाडीतील चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्यानजीकच्या संरक्षक भिंतीला आदळून १० ते १५ मीटर अंतरावर फरफटत जाऊन रस्त्याच्या कडेला झाडीमध्ये पलटी झाली. या अपघातात गाडीतील काहींना किरकोळ दुखापत झाली. तर गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. गाडीतून प्रवास करणारे सर्व प्रवासी हे कुडाळ तालुक्यातील असल्याचे समजते.

………………….. *👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*

*🎴 कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!