तर संगणकीय कामकाज बंद करू……….रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाच्या वतीने ईशारा
_*🛑तर संगणकीय कामकाज बंद करू……….रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाच्या वतीने ईशारा*_
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी, दि९ऑक्टोबर:-*
राज्य तलाठी महासंघाच्या अध्यक्षांनी सोशल मीडियावर टाकलेल्या मेसेजबाबत ई-महाभूमी प्रकल्पाचे राज्य समन्वयक श्री रामदास जगताप यांनी अपशब्द काढल्याने राज्यभरातील तलाठी संतप्त झाले आहेत. शासनाने तातडीने त्यांची बदली करावी, अन्यथा संगणकीय कामकाज बंद करू, असा इशारा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाच्या वतीने देण्यात आलेला आहे. या बाबतचे निवेदन मा. रविंद्र मठपती उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन यांचेकडे दि. ०८ ऑक्टोबर २०२१ रोजी जिल्हा संघाच्या वतीने देण्यात आले आहे.याचप्रमाणे सावंतवाडी तालुका तलाठी संघटनेच्या वतीने या निवेदनाची प्रत.मा
उपविभागीय अधिकारी सावंतवाडी व मा.तहसीलदार सावंतवाडी यांना दि 08/10/2021 रोजी देण्यात आली .सदरचे निवेदन त्यांच्या वतीने मा.नायब तहसिलदार श्री.बांदेकर व श्री स्वप्नील प्रभू अ. का.यांनी स्वीकारले .तलाठी संघाच्या वतीने सावंतवाडी तालुका अध्यक्ष श्री.किरण गजिनकर,संघटक श्री विनायक कोदे यांनी निवेदन दिले.सदरवेळी मंडळ अधिकारी श्री गुरुनाथ गुरव,तलाठी श्री दिगंबर डवरे,श्री अनिल आयरे,श्री सुमित घाडीगांवकर, श्री.संदिप मुळीक ,श्रीमती नेत्रा सावंत,श्री सचिन चितारे
व अन्य तलाठी मंडळ अधिकारी उपस्थित होते.
राज्यभरात अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यासोबतच ई पीक पाहणी व मोफत सातबारा वाटपाचे कामही केले जात आहे. हे काम प्राधान्याने करावे, असा मेसेज राज्य तलाठी महासंघटनाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल अप्पा यांनी सर्व तलाठ्यांना सोशल मीडियावरून दिला आहे. हाच मेसेज पुण्याचे जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या ग्रुपवर पाठविला. त्या संदेशास प्रतिक्रीया देताना मूर्खासारखे असे मेसेज सोशल मीडियावर का टाकला, असा मेसेज श्री.जगताप यांनी टाकला आहे. यामुळे तलाठी संघटना आक्रमक झाली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाच्या वतीने निषेध केला आहे. राज्य समन्वयक या पदावरून जगताप यांची तातडीने बदली करण्यात यावी, अन्यथा तलाठी संघटना संगणकीय कामकाज करणार नाही, असा इशारा देऊन महाराष्ट्रराज्य तलाठी संघाने आंदोलनात्मक पवित्रा घेतलेला असून या आंदोलनास पाठिंबा म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघ आंदोलनात सहभागी होत आहे.
तलाठी, मंडळाधिकारी हे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतीमान व पारदर्शक करण्यासाठी तसेच महसूली उत्पन्नात वाढ करून राज्याचा विकासाचा मार्ग गतीमान करण्यासाठी प्रयत्नशिल आहे. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करीत असतांना महसूली लेखे संगणकीकृत करणे, ७/१२ व ई फेरफार, ई चावडी या विविध योजना तलाठी व मंडळाधिकारी यांनी स्वखर्चाने व रात्रंदिवस काम करून शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेलेला आहे. असे असतांना नवनवीन उपक्रम राबविण्याचा प्रयत्न राज्य समन्वयक यांचेमार्फत होत असतांना संगणीकृत प्रणालीमध्ये असंख्य त्रुटी निर्माण झाल्याने त्याचा परिणाम शासनाच्या लोकाभिमुख योजनांवर होत आहे. वेळोवेळी याबाबत चर्चा होऊन देखील त्यामध्ये कोणत्याही स्वरुपाचे बदल न होता नवनवीन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यामुळे तलाठी संवर्गात कामाच्या तणावामुळे तसेच जनतेच्या कामाची तातडीने पूर्तता करू न शकल्याने जनतेच्या रोषास सामोरे जावे लागत आहे.
दि. ११ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करणे, १२ ऑक्टोबर रोजी लोकप्रतिनिधींना निवेदन देणे, याउपरही श्री रामदास जगताप यांच्यावर कारवाई न झाल्यास १३ ऑक्टोबर पासून कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे .
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
_*🏃♂️प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू….🏃♂️*_
*_📚😍१०वी, १२वी, पदवीधर विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी…😍_*
*● उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*•बी.ए.*. *•बी.कॉम.*
*•एम.ए.* *•एम.कॉम.*
*•एम.बी.ए.* *•रूग्ण सहायक*
*🎓सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र*
*🎴प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क :-*
*यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,सावंतवाडी नगरपालिकेजवळ, सावंतवाडी.*
*मोबा. 8605992334*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

