🛑 पालकमंत्री उदय सामंत आजपासून जिल्हा दौऱ्यावर..
*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०७ :-* उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्यापासून दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. गुरुवार दिनांक 7 ऑक्टोंबर 2021 रोजी दुपारी 4 वाजता पाली येथून मोटारीने चिपी विमानतळ सिंधुदुर्गकडे प्रयाण. रात्री 8 वाजता आगमन व चिपी विमानतळ येथे आढावा बैठक स्थळ :चिपी विमानतळ, ता. वेंगुर्ला रात्री सोईनुसार शासकीय विश्रामगृह वेंगुर्ला येथे आगमन व राखीव. शुक्रवार दिनांक 8 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह, वेंगुर्ला येथून मोटारीने चिपी विमानतळकडे प्रयाण, सकाळी 10.30 वाजता आगमन व चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी राखीव, स्थळ: चिपी विमानतळ, ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग, दुपारी 1 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग बाबत आढावा बैठक. स्थळ : तहसिल कार्यालय, वेंगुर्ला, दुपारी 2 वाजता महाविकास आघाडी समन्वय समिती सभा स्थळ: फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला.दुपारी 4 वाजता वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने भटवाडी वेशी येथे स्वागत कमानीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ: वेंगुर्ला नगरपालिका कार्यक्षेत्र, वेंगुर्ला . दुपारी 4.15 वाजता वेंगुर्ला नगरपरिषदेने नव्याने साकारलेल्या कवी मंगेश पाडगांवकर बालोद्यानच्या लोकर्पण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ: कॅम्प, वेंगुर्ला. सायंकाळी 4.30 वाजता नगरपरिषदेने नुतनीकरण केलेल्या मानसीश्वर उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता नगरपरिषदेने पर्यटन निधीतून साकारलेल्या दिपगृहकडे जाणाऱ्या पादचारी मार्गाच्या लोकर्पण सोहळ्यास उपस्थिती. स्थळ: वेंगुर्ला बंदर वेंगुर्ला. सायंकाळी 5.15 वाजता नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थिती, स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज सभागृह वेंगुर्ला. सायंकाळी 6.00 वाजता वेंगुर्ला येथून मोटारीने आजगांव ता. सावंतवाडीकडे प्रयाण. सायंकाळी 6.30 वाजता स्वप्निल आजगांवकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट. स्थळ : आजगांव, ता. सावंतवाडी. सोईनुसार आजगांव येथून मोटारीने वेंगुर्लाकडे प्रयाण. रात्री सोईनुसार शासकीय विश्रामगृह, वेंगुर्ला येथे आगमन व राखीव.

