मुंबईराजकीयशासकीयसामाजिक

घोटगे-सोनवडे-शिवडाव घाटमार्गाच्या कामासाठी आशियाई बँक सहाय्य योजनेतून निधी देण्याचा प्रस्ताव; बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे

🎴मुंबई, दि.१६: कोकण आणि कोल्हापूरला जोडणाऱ्या मठ-कुडाळ-घोटगे-सोनवडे-शिवडाव-गारगोटी घाट मार्गच्या ११.८७ कि.मी. लांबीच्या रस्त्याच्या कामासाठी आशियाई विकास बँकेच्या सहाय्य योजनेतून निधी देण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. अशोक चव्हाण यांनी आज येथे दिले.

घोटगे-सोनवडे- शिवडाव राज्य मार्गाच्या कामासंदर्भात आज श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार प्रकाश आबीटकर हे उपस्थित होते. तसेच खासदार संजय मंडलिक व आमदार वैभव नाईक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सहभाग घेतला.

कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा ९४ कि.मी. लांबीचा हा मार्ग असून त्यातील ११.८७ कि.मी. लांबीचा मार्ग हा घाटरस्ता म्हणून प्रस्तावित आहे. या रस्त्याच्या कामासाठी निधी द्यावा, अशी मागणी खासदार श्री. राऊत, आमदार श्री. आबीटकर, श्री. साळवी व श्री. नाईक यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांच्याकडे केली.

घाट मार्गाच्या ११.८७ किमी रस्ता तयार करण्यासाठी सर्व पर्यावरण व वन्यजीव विषयक परवाने मिळाले आहेत. या कामासाठी आशियाई विकास बँक सहाय्यित योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामधून निधीची तरतूद करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश श्री. चव्हाण यांनी यावेळी दिले.

खासदार श्री. राऊत यांनी सांगितले की, या घाटमार्गासाठी निधीची तरतूद झाल्यास प्रलंबित १२ कि.मी.च्या रस्त्याचे काम मार्गी लागून गेल्या वीस वर्षापासूनचा हा प्रश्न सुटेल. या रस्त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र व कोकण हे जोडले जाणार आहेत. तसेच पावसाळ्यात दळणवळणाचे साधन उपलब्ध होईल.

*😍☺️🏠 बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली…लाल माती आणि गोड शहाळी… शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते… हे स्वप्न साकारायचं आहे ना?. मग चिंता  कशाला?, आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!